कर्मचारी कपाती दरम्यान Quiet Hiringचा नवा ट्रेंड, गार्टनर कंपनीचा मोठा खुलासा

मागील काही दिवसांपासून अॅमेझॉन ते मायक्रोसॉफ्ट अशा मोठ्या कंपन्यांकडून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. अनेक लोकं बेरोजगार झाले आहेत. मात्र, या कर्मचारी कपाती दरम्यान ‘Quiet Hiring’चा नवा ट्रेंड सध्या सुरू असून याबाबत गार्टनर कंपनीने मोठा खुलासा केला आहे. कॉर्पोरेट जगताने अलीकडच्या काळात अनेक ट्रेंड पाहिले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने राजीनामा देणे, शांतपणे नोकरी सोडणे, एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करणे आणि कंपन्यांच्या धोरणावर नाराज होऊन इतर कंपन्यांमध्ये अर्ज करणे, या ट्रेंडचा समावेश आहे.

हे सर्व ट्रेंड सुरू असतानाच त्यामध्ये आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. त्याला Quiet Hiring असं म्हणतात. या अंतर्गत कंपन्या कंपनींमध्ये काम करणाऱ्या लोकांनाच रिक्त पदांवर बढती देण्याचं काम करत आहेत. परंतु, तांत्रिक सल्लागार आणि संशोधन कंपनी गार्टनरने या ट्रेंडचा खुलासा केला आहे. कंपन्या नवीन भरती करण्याऐवजी रिक्त जागांवर कंपनीतील कर्मचाऱ्यांना बढती देत आहेत, असं गार्टनरचं म्हणणं आहे.

कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना नवनवीन कौशल्यं शिकवली जात आहेत. त्याचवेळी, विशिष्ट काम करण्यासाठी तात्पुरते कर्मचारी नियुक्त करणे, या ट्रेंडच्या मदतीने आणि मंदीच्या काळात त्यांचे उत्पादन कमी करावे लागणार नाही. तसेच त्यांना कामावरून कमी करण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त कंपनी त्यांना मार्गदर्शन करत डेटा सायंटिस्ट म्हणून काम करायला लावते. या भरतीचा फायदा फक्त कंपन्यांना होत नाही, तर नवीन विभागांमध्ये नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही होत आहे. दरम्यान, अशा भरतींना २०२२ पासून सुरूवात झाली असून अनेक कंपन्यांकडून हा ट्रेंड फॉलो केला जात आहे.


हेही वाचा : टिपू सुलतान विरुद्ध सावरकर, चौकाला नाव देण्यावरुन वादंग; कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू