पाकिस्तानच्या कोळसा खाणीत गॅसचा भीषण स्फोट, ९ कामगारांचा मृत्यू

पाकिस्तानच्या खैबरमधील पख्तूनख्वा या परिसरातील कोळसा खाणीत गॅसचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. जिल्हा पोलीस अधिकारी नाझीर खान यांनी सांगितले की, काल बुधवारी खैबर पख्तुनख्वाच्या ओरकझाई आदिवासी जिल्ह्यातील डॉली कोळसा खाणीत १३ कामगार होते. तेव्हा खाणीत गॅसच्या ठिणगीमुळे भीषण स्फोट झाला.

९ मृतदेह सापडले

उपायुक्त अदनान खान यांनी सांगितले की, लीज कॉन्ट्रॅक्टरसह नऊ मृतदेह सापडले आहेत. उर्वरित ४ कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना केडीए जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले.

खनिज विकास विभागाच्या पथकाने घटनास्थळाची केली पाहणी

शासनाच्या खनिज विकास विभाग अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि खाणीच्या आत गॅसच्या ठिणगीच्या रूपात स्फोटाचे कारण शोधून काढले. अफगाण सीमेवरील वायव्य ओराकझाई जिल्ह्यात कोळशाचे साठे आढळतात आणि प्रामुख्याने खाणींमध्ये गॅस तयार झाल्यामुळे अपघात होतात.


हेही वाचा : रामाच्या अस्तित्वाबाबत संशय घेणारे आता ‘रावण’ घेऊन आले आहेत, मोदींचा पलटवार