हैदराबादमधील कॉलेजच्या लॅबमध्ये गॅस गळती; 25 विद्यार्थी बाधित

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील कस्तुरबा शासकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत रासायनिक गॅसच्या गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. या गॅसलच्या गळतीमुळे 25 विद्यार्थी बाधित झाले आहेत.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील कस्तुरबा शासकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत रासायनिक गॅसच्या गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. या गॅसलच्या गळतीमुळे 25 विद्यार्थी बाधित झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. (Gas leak in college lab in Hyderabad 25 students affected)

गॅस गळतीमुळे विद्यार्थ्यांना मळमळ आणि चक्कर येत होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रयोगशाळेत कोणत्या गॅसची गळती झाली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक या गळतीचा शोध घेत आहेत.

यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील कॉर्पोरेशन मिडल स्कूलच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांच्या आवारात सेप्टिक टाकीतून गॅस गळती झाल्याचा संशय आला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी मध्यान्ह भोजनानंतर अचानक आजारी पडले. काही विद्यार्थ्यांना वर्गात उलट्या झाल्या होत्या. यावेळी एकूण 67 मुला-मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळ, होसूर महामंडळ आणि शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.


हेही वाचा – वरळी येथे समुद्रात ५ मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तीनजण बचावले