घरताज्या घडामोडीगॅस गळती: १० जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी बोलावली आपत्कालीन बैठक

गॅस गळती: १० जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी बोलावली आपत्कालीन बैठक

Subscribe

विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर कारखान्यात गॅस गळतीने १० जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर कारखान्यात गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. गॅस गळतीच्या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. गॅस गळती घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली आपत्कालीन बैठक बोलवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम मधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीएमए (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) ची बैठक बोलावली. या बैठकित केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी विशाखापट्टणमला रवाना झाले. ते किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांना भेटणार आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत विषारी वायूची गळती; ३ ठार

- Advertisement -

विशाखापट्टणम गॅस गळती हा अपघात आहे. कंपनी सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत होती. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पाठवली जात आहेत. सुमारे ८०० जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर अनेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्ण घटनेचा तपास केला जाईल, असं आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक दामोदर गौतम सवांग यांनी सांगितलं.

आंध्र प्रदेशचे उद्योगमंत्री एमजी रेड्डी म्हणाले की, कारखान्यात गॅस गळतीची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब लॉकडाऊन प्रक्रिया सुरू करण्यात आली. स्थानिक प्रशासनाला कळवण्यात आले. परंतु थोडी गॅस कारखाना परिसरातून बाहेरच्या परिसरात गेली आणि त्याचा परिणाम लोकांवर झाला. ते म्हणाले की जी कंपनी या गॅसचं व्यवस्थापन करीत आहे, त्या कंपनीने घटनेची जबाबदारी घ्यावी. त्यांना पुढे येऊन आम्हाला सांगावं लागेल की कोणत्या प्रोटोकॉलचे अनुसरण केले गेले आणि कोणते अनुसरण केले गेले नाही. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई केली जाईल.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -