घरदेश-विदेशGATE 2022 : ३० ऑगस्टपासून सुरु होणार GATE परीक्षेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया, फेब्रुवारी...

GATE 2022 : ३० ऑगस्टपासून सुरु होणार GATE परीक्षेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया, फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल परीक्षा

Subscribe

ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (Graduate Aptitude Test in Engineering , GATE 2022) परीक्षेसाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठीची तारीख निश्चित झाली आहे. यानुसार परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३० ऑगस्ट २०२१ पासून ते २४ सप्टेंबरपर्यंत सुरु राहिल. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in/ वर जात ऑनलाईन अर्ज करु शकतात.

मात्र सर्व उमेदवारांना कोरोनाविरोधी लस घेण्याचा सल्ला संस्थेने दिला आहे. आयआयटी खडगपुरने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मात्र कोरोना परिस्थितीचा अंदाज घेत परिस्थिती बिकट झाल्यास वेबसाइटवर जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला जाऊ शकतो. अशावेळी GATE 2022 परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. यावर्षी परीक्षेसाठी दोन नवीन पेपर सादर करण्यात आले आहेत-Geomatics Engineering (GE) आणि नेवल आर्किटेक्चर आणि मरीन इंजिनीअरिंग (NM).

- Advertisement -

आता Whatsapp वरुनही करु शकता लसीसाठी स्लॉट बुक, जाणून घ्या कसे?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -