घरदेश-विदेशनवीन संसद भवन : राहुल गांधींना भाजपचा टोला; म्हणाले, ऐतिहासिक क्षण आला...

नवीन संसद भवन : राहुल गांधींना भाजपचा टोला; म्हणाले, ऐतिहासिक क्षण आला की…

Subscribe

 

 

- Advertisement -

नवी दिल्लीः ऐतिहासिक क्षण आला की कॉंग्रेस नेते राहुल गांधींची आरडाओरड सुरु होते. ते लहान मुलासारखे रडत असतात, असा टोला भाजत प्रवक्ते गौरव भाटिया यांना लगावला.

नवीन संसद भवनचे २८ मे २०२३ रोजी उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नविन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत. यावर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुरमुर यांनी नवीन संसद भवनचे उद्घाटन करावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. यावर भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं का होतं की जेव्हा देशाची प्रगती होत असते तेव्हाच राहुल गांधी अपशुकन बनून समोर येतात. नवीन संसद भवन हे लोकशाहीचे मंदिर आहे. राहुल गांधी यांची विचार शक्ती इतकी छोटी आहे की ते या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करत नाहीत, अशी टीका भाटिया यांनी केली.

- Advertisement -

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनावर आक्षेप घेतला आहे. नविन संसद भवन ही भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या उद्घाटनाचा खरा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. राष्ट्रपतींच्या हस्तेच नवीन वास्तूचं उद्घाटन झाले तर तो लोकशाहीचा सन्मान असेल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नवीन संसद भवनचे उद्घाटन न करता राष्ट्रपतींच्या हस्तेच उद्घाटन व्हावे. मोदी सरकार वारंवार नियमांचे उल्लंघन करत आहे. राष्ट्रपती कार्यालय हे भाजप आणि आरएसएसच्या ताब्यात आहे, असा आरोप खरगे यांनी केला आहे.

दलित आणि आदिवासींच्या मतांसाठी पंतप्रधान मोदींनी द्रौपदी मुरमुर यांची राष्ट्रपतीपदी निवड केली आहे, अशी टीकाही खरगे यांनी केली. यावर गौरव भाटिया म्हणाले, कॉंग्रेसच्या माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी यांनीच नवीन संसद भवनची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. आता हेच कॉंग्रेसवाले मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनावर आक्षेप घेत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -