अंबानी नव्हे आता गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

gautam adani became the richest man in asia mukesh ambani left at second position
अंबानी नव्हे आता गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मागील दोन वर्षांपासून मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गौतम अदानी यांच्या संपत्ती इतकी वाढ झाली आहे की त्यांनी मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे. यामुळे गौतम अदानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान मिळवला आहे. शेअर्स मार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बुधवारी तेजी आली. त्याचवेळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

दरम्यान सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्स समूहाची एका मोठी डील होणार होती, मात्र ही डील रद्द झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली होतेय. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रिजला मोठा फटका सहन करावा लागत असून महसुलातही मोठी घट झाली आहे. आज शेअर्स बाजारात रिलायन्सच्या शेअर्समध्ये १.४४ टक्क्यांची घट होऊन तो २३५१.४० रुपयांवर बंद झाला आहे.

मात्र अदानी समूहाच्या शेअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये तब्बल ४.६३ टक्क्यांची वाढ होऊन तो ७६३ रुपयांवर पोहोचला आहे. तर अदानी एंटरप्राईजच्या शेअर्समध्ये २.०८ टक्क्यांची वाढ होऊन तो १७४२ रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान अदानी समूहाच्या एकूण सहा कंपन्या लिस्टेड आहेत. त्यांच्या शेअर्सच्या किंमतींमध्येही सातत्याने वाढ होतेय.

गौतम अदानींच्या एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५५ अब्ज डॉलर्सने वाढलीय. मात्र मुकेश अंबानींची संपत्ती केवळ १४.३ अब्ज डॉलर्सनी वाढलीय. यामुळे गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २६१ टक्क्यांनी वाढलीय. यामुळे अदानींची संपत्ती १,४०,२०० कोटींवरून ५,०५,९०० कोटींवर गेली आहे. यामुळे गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास अदानींच्या संपत्तीत ३,६५,७०० कोटींची भर पडलीय.


शहीद CRPF जवानांच्या कुटुंबियांनी मोदी सरकारकडून मिळणार आत्ता ३५ लाखांची मदत