Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशGautam Adani : आम्हाला ते सर्व आरोप अमान्य, अदानींनी निवेदन जारी करत...

Gautam Adani : आम्हाला ते सर्व आरोप अमान्य, अदानींनी निवेदन जारी करत मांडली भूमिका

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेने गुंतवणूकदारांची कथित फसवणूक आणि लाच दिल्याचा आरोप केला आहे. पण हे आरोप आता अदानी समुहाकडून फेटाळून लावण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची कथित फसवणूक आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे यांसारखे आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने हे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आता अदानी समुहाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून अदानी समुहाने गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर, या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींचा विचार करत आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Gautam Adani Group has denied all the allegations leveled by the US SEC)

अमेरिकेच्या एसईसी या सरकारी संस्थेने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि लाच दिल्याचे आरोप केल्यानंतर देशात खळबळ उडाली. ज्यानंतर काँग्रेसनेही अदानी यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप केले. त्यामुळे अदानी समुहाकडून तत्काळ एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदानी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत. अमेरिकेच्या विधी विभागानेच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींची विचार करत आहोत, असे या निवेदनातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Gautam Adani : अदानी पुन्हा फसले, अमेरिकेने भ्रष्टाचार आणि लाचखोरीसारखे गंभीर आरोप लावले

तसेच, अदानी समूह कायद्याचे पालन करण्यासाठी बांधील आहे. अदानी समूह कायमच व्यवस्थापनाच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करत आला आहे. त्याशिवाय, कारभारात पारदर्शकता आणि कंपनीच्या सर्वच विभागात नियमांचे पालन या बाबी अदानी समूहासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही आमच्या भागधारकांना, भागीदारांना आणि कर्मचाऱ्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की, अदानी समूह हा एक कायद्याचे पालन करणारा समूह असून सर्व कायद्यांचा आदर राखतो, असे अदानी समुहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आता या निवेदनात म्हटल्याप्रमाणे अदानी कायद्याच्या मार्गाने जात कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

अमेरिकेच्या एसईसी या सरकारी संस्थेने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि लाच दिल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि इतर काही सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहेत. अदानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून सौर ऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळविण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल 2 हजार 19 कोटी रूपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली असल्याचा गंभीर आरोप आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -