घरताज्या घडामोडीएका बातमीमुळे दोन दिवसांत गौतम अदानी यांनी गमावले ४० हजार कोटी

एका बातमीमुळे दोन दिवसांत गौतम अदानी यांनी गमावले ४० हजार कोटी

Subscribe

देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये गेल्या दोन दिवसांत ५.५ अरब अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ४० हजार कोटी रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी एका बातमीमुळे अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले आणि त्यांना अब्जावधीचे नुकसान झाले. गेल्या १० वर्षांत अदानी कंपनीचे शेअर्स सरळ रेषेत चढत गेले. पण सोमवारी शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे गौतम अदानी यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

काय होती ‘ती’ बातमी?

सोमवारी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)ने तीन परदेशी पोर्टफोलिओ अकाउंट गोठविली असल्याची बातमी समोर आली. या पोर्टफोलिओ अकाउंटमध्ये अदानी कंपन्यांनी ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. यामुळे अदानी समूह कंपन्यांचे शेअर सोमवारी धाडकन पडले. बहुतेक शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले. तसेच मंगळवारी देखील अदानी समूहाच्या अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले.

- Advertisement -

इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, NSDLने Albula इन्व्हेस्टमेंट फंड, Cresta फंड आणि APMS इन्व्हेस्टमेंट फंडचे अकाउंट गोठवले. डिपॉजिटरी वेबसाईटच्या माहितीनुसार, हे अकाउंट ३१ मेला किंवा त्याच्या अगोदरचे गोठवले गेले आहेत. ही बातमी येताच सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर अदानी नेटवर्कमध्ये अचानक १० अरब डॉलर्सची घसरण झाली. पण त्यानंतर यामध्ये थोडीशी सुधारणा झाली. शेअर्स घसरल्यानंतर अदानी समूहाने सोमवारी दुपारी याबाबत निवेदन जारी केले आणि सांगितले की, या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही आहे. NSDLने सुद्धा हे वृत्त फेटाळले. यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये थोडीशी सुधारणा झाली. परंतु पूर्णपणे रिकव्हरी झाली नाही. मंगळवारी पुन्हा अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किट लावला गेला.

ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, शुक्रवारी शेअर बाजार ५.६४ लाख कोटी रुपयांवर बंद झाला. त्यावेळीस गौतम अदानी यांचे नेटवर्थ ७७ अरब डॉलर होते. मंगळवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर त्याचे नेटवर्थ ७१.५ अरब डॉलर (५.२४ लाख कोटी रुपये) झाले. म्हणजेच दोन दिवसांत अदानी नेटवर्थमध्ये ५.५ अरब डॉलर (४० हजार कोटी रुपये) इतकी घसरण झाली.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्राच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे Twitter ला पडले महाग, कायदेशीर कारवाईला जावे लागणार सामोरे


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -