Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश गौतम अदानी यांच्या अडचणी संपेना, OCCRP च्या अहवालातून करण्यात आले नवे आरोप

गौतम अदानी यांच्या अडचणी संपेना, OCCRP च्या अहवालातून करण्यात आले नवे आरोप

Subscribe

अदानी समुहाकडून स्वतःचे शेअर्स खरेदी करून त्यामार्फत स्टॉक एक्सचेंजमध्ये लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्ससोबत शेअर केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : काही महिन्यांपूर्वी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर हिंडनबर्ग या संस्थेकडून शेअरच्या किमतीत फेरफार करण्यात आल्याचे आरोप करण्या आले होते. ज्यानंतर अचानकपणे अदानी यांच्या शेअरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली. जगातील श्रीमंतांच्या यादीत 10 जणांमध्ये नाव येणारे अदानी हे 10 श्रीमंतांच्या यादीच्या बाहेर गेले. ज्यानंतर अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली. आता कुठे अदानी यांच्यासोबत सर्व काही सुरळीत होत असताना त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Gautam Adani was accused by the OCCRP report)

हेही वाचा – Narendra Modi तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान? परदेशातील भारतीयांना विश्वास, सर्वेक्षणावर भाजपा खूश

- Advertisement -

अदानी समुहाकडून स्वतःचे शेअर्स खरेदी करून त्यामार्फत स्टॉक एक्सचेंजमध्ये लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्ससोबत शेअर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज अदानी समूहाच्या शेअर्सवर या अहवालाचा काय परिणाम होतो, याकडे गुंतवणूकदार आणि बाजाराचे लक्ष लागून राहिलेले आहे.

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने मॉरिशस आणि अदानी ग्रुपच्या अंतर्गत ईमेलद्वारे झालेले व्यवहार पाहिले असून यामध्ये गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाचे शेअर्स खरेदी-विक्री केल्याची दोन प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, पहिल्यांदाच अदानी समूहाने मॉरिशसमध्ये केलेल्या व्यवहारांचा तपशील जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 2013 ते 2018 या कालावधीत अदानी समुहात सहभागी असलेल्या कंपन्यांनी त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले, असल्याचा आरोप OCCRP कडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या नव्या आरोपांवर गौतम अदानी नेमके काय स्पष्टीकरण देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

गौतम अदानी यांच्यावर शेअर्सच्याबाबत आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांच्यावर अमेरिकेची कंपनी असलेल्या हिंडनबर्ग यांच्याकडून आरोप करण्यात आलेले होते. अमेरिकेची फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी हिंडनबर्गने एका रिसर्चमधून अदानी ग्रुपवर सामाजिक फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडमध्ये गुंतल्याचे अनेक गंभीर आरोप केले. मात्र अदानी ग्रुपने हे आरोप फेटाळून लावत हा रिपोर्ट विशिष्ट ग्रुपला बदनाम करण्याच्या हेतूने तयार केल्याचे म्हटले होते. अदानी समुहाकडून या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले. 413 पानांच्या या निवेदनातून अदानी ग्रुपने हिंडनबर्गच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हिंडनबर्गने केलेले आरोप म्हणजे देशाच्या महत्वकांक्षेवर केलेला नियोजित हल्ला असल्याचे मत अदानी ग्रुपने मांडले. मात्र हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमुळे अदानी ग्रुपच्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -