ACC, Ambuja Cement कंपन्या आता गौतम अदानी करणार टेकओव्हर; इतक्या कोटींत झाला सौदा

gautam adani will be new cement baron takeover holcim stake in acc and ambuja
ACC, Ambuja Cement कंपन्या आता गौतम अदानी करणार टेकओव्हर; इतक्या कोटींत घेणार ताब्यात

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे सिमेंट किंग होणार आहेत. त्यांच्या अदानी समुहाने देशातील दोन सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्या एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स खरेदी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात अबुधाबी आणि लंडनमध्ये यासाठी 10.5 अब्ज डॉलर्सचा हा खरेदी व्यवहार झाला.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी कुटुंबाने विशेष ऑफशोर कंपनी (SPV) स्थापन करत स्विस सिमेंट कंपनी Holcim Ltd सोबत ACC आणि अंबुजा सिमेंट कंपन्यांचे भागभांडवल खरेदी केले आहेत. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये निश्चित करार झाला असून यासोबतच अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही उतरणार आहे.

Holcim आणि त्याच्या सब्सिडियरी कंपन्यांचा अंबुजा सिमेंटमध्ये 63.19 टक्के आणि ACC मध्ये 54.53 टक्के हिस्सा आहे. ACC सिमेंटमधील 54.53 टक्के स्टेकपैकी, 50.05 टक्के स्टेक अंबुजा सिमेंट मार्फत विकत घेतला होता. अदानी समूहाने दोन्ही कंपन्यांमधील होल्सीमच्या स्टेकसाठी 10.5 बिलियन डॉलरचा (सुमारे 81,360 कोटी रुपये) करार केला आहे. पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रातील हा देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.

अदानी बनले ‘सिमेंट किंग’

Holcim ग्रुपच्या कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत. कंपनीचे भारतात तीन मोठे ब्रँड आहेत, ज्यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम यांचा समावेश आहे. हॉल्सिम ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट नंतरची भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 दशलक्ष टन आहे.

अदानी समूहाच्या या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर ती भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनली आहे. अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत. तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट आहेत. एकट्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 31 दशलक्ष टन आहे.


Monsoon News : खूशखबर! मान्सून अंदमान निकोबार बेटांसह ‘या’ भागात दाखल होण्याची शक्यता