घरक्रीडागौतम गंभीर घेणार २५ Sex Workers च्या मुलींची जबाबदारी

गौतम गंभीर घेणार २५ Sex Workers च्या मुलींची जबाबदारी

Subscribe

गौतम गंभीरच्या या मोहिमेला 'पंख' असे नाव देण्यात आले आहे

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी गुरुवारी शहरातील जीबी रोड परिसरातील सेक्स वर्कर्सच्या मुलींना मदत करण्यासाठी पुढाकार जाहीर केला. क्रिकेटरपासून राजकीय नेता झालेले गंभीर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील सेक्स वर्कर्सच्या २५ अल्पवयीन मुलींची काळजी, जबाबदारी घेतली जाणार असून शुक्रवारी याची सुरूवात केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गौतम गंभीर यांच्या आजीचा वाढदिवस असून या दिवसापासून त्यांना ही मोहीम सुरू करायची आहे.

किमान २५ मुलींना मदत करण्याचे लक्ष्य

‘समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगले आयुष्य जगण्याचा हक्क आहे आणि मला खात्री करायची आहे की या मुलींना अधिक संधी मिळाल्या पाहिजेत जेणेकरुन त्यांचे स्वप्न सत्यात उतरतील. मी त्यांच्या उपजीविका, शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेईन.’ असे ते म्हणाले. तसेच यावेळी दहा मुलींची निवड केली आहे, ज्या विविध सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. आगामी सत्रात या कार्यक्रमात आणखी मुलींची जबाबदारी घेण्यात येणार असून, किमान २५ मुलींना मदत करण्याचे लक्ष्य आहे, असे गंभीर यांनी सांगितले.

- Advertisement -

मोहिमेअंतर्गत मुलींना सक्षम करण्याचे ध्येय

गौतम गंभीरच्या या मोहिमेला ‘पंख’ असे नाव देण्यात आले आहे. निवडलेल्या मुली सध्या दिल्लीतील शेल्टर होममध्ये राहत असल्याची माहिती गौतम गंभीर यांनी दिली. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचे समुपदेशन केले जाईल, ज्याद्वारे त्यांना अधिक सक्षम होण्यास मदत केली जाईल. त्याचबरोबर गंभीरने आवाहन केले आहे की, जर समाजातील कोणालाही या मोहिमेमध्ये त्यांचे पाठबळ द्यायचे असेल तर तोही या कार्यात सामील होऊ शकतो.


राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -