घरदेश-विदेश...ते आम्ही करुन दाखवलं - गौतम गंभीर

…ते आम्ही करुन दाखवलं – गौतम गंभीर

Subscribe

गौतम गंभाीर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर राज्यसभेत झालेल्या ऐतिहासिक निर्णयावरन प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर संदर्भात महत्त्वाचे कायदे घोषित केले. यामध्ये कलम ३७० आणि ३५ ‘अ’ कायद्यातील महत्त्वाच्या तरतूदी रद्द करण्याचा निर्णय राज्यसभेत मंजूर झाला. त्यामुळे देशभरात मोदी सरकारचे आणि अमित शहांचे कौतुक केले जात आहे. ३७० कायदा रद्द झाल्यामुळे देशभरात पेडे वाटले जात आहे. देशातील नागरिक वेगवेगळ्याप्रकारे आपला आनंदत व्यक्त करत आहेत. दरम्यान, यासंदर्भात भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी जे कोणीही आतापर्यंत करु शकले नाही, ते आम्ही करुन दाखवले, असे गंभीर म्हणाले.

काश्मीरमध्ये आपला तिरंगा फडकणार – गंभीर

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिल्यामुळे काश्मीरचा वेगळा झेंडा होता. त्या भागातील नागरिकांचे वेगवेगळे कायदे होते. त्यामुळे भारतीय नागरिकांना या भागात दुय्यम स्थान दिले जायचे. भारतीयांना त्या भागात गुंतवणूक करता येत नव्हती. या कायद्यामुळे काश्मीरी जनतेचे मोठे नुकसान झाल्याचे अमित शहा राज्यसभेत म्हणाले. त्यामुळे आपण हा कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे अमित शहा यांनी सांगितले. दरम्यान, हा कायदा राज्यसभेत मंजूर झाला. कलम ३७० वादग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत कोणत्याही सरकारला यावर तोडगा काढता आलेला नव्हता. त्यामुळे गौतम गंभीर यांनी आपल्या ट्विटमध्ये जे कुणीही करु शकले नाही, ते आम्ही करुन दाखवले. याशिवाय आता काश्मीरमध्ये आपला तिरंगा फडकेल, असेही गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यसभेत अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती टिकली नाही का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -