महिलेविरुद्ध द्वेषाचे खराब प्रदर्शन, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गौतम गंभीरचे नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ ट्विट

मौन बाळगल्याबद्दल धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांना गंभीरने लक्ष्य केलय. माफी मागणाऱ्या महिलेविरुद्ध द्वेषाचे खराब प्रदर्शन सुरु असल्याचे गंभीर म्हणाला आहे.

Gautam Gambhir's tweet in support of Nupur Sharma over controversial statement
महिलेविरुद्ध द्वेषाचे खराब प्रदर्शन, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गौतम गंभीरचे नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ ट्विट

वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नुपूर शर्मा यांना आता राजकीय नेते आणि देशातील नागिरकांकडून पाठिंबा मिळत आहे. भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणातून भाजपने त्यांना निलंबित केलं आहे. परंतु आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांना आता धमक्या देण्यात येत आहेत. यावरुन गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे. नुपूर शर्मा यांना देण्यात आलेल्या धमक्यांवर मौन बाळगणाऱ्यांवर गौतम गंभीरने निशाणा साधला आहे. मौन बाळगल्याबद्दल धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांना गंभीरने लक्ष्य केलय. माफी मागणाऱ्या महिलेविरुद्ध द्वेषाचे खराब प्रदर्शन सुरु असल्याचे गंभीर म्हणाला आहे.

भाजप खासदार गौतम गंभीरने वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी वादात सापडलेल्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने म्हटलं आहे की, “निश्चितपणे माफी मागणाऱ्या महिलेविरुद्ध द्वेषाचे वेडेपणाचे प्रदर्शन आणि ज्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांनी बाळगलेले मौन गंभीर आहे.

नुपूर शर्मा यांनी चर्चेदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विधानाला अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. हा वाद आणखी वाढणार नाही, असा विचार करून भाजपने शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, असे असतानाही देशातील अनेक शहरांमध्ये शर्मा यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. काही अतिरेक्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) खासदार इम्तियाज जलील यांनी शर्मा यांना फाशी देण्याची मागणी केली होती.

यापूर्वी भाजप नेते कपिल मिश्रा आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी उघडपणे शर्मा यांचे समर्थन केले होते. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी ट्विट केले की, सत्य बोलणे हे बंड असेल तर मीही बंडखोर आहे. यापूर्वी भाजप नेते कपिल मिश्रा आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी उघडपणे शर्मा यांचे समर्थन केले होते. साध्वी यांनी दुसरीकडे, टेलिव्हिजन चर्चेदरम्यान पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माने पक्षाचा निर्णय मान्य केला असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी