घरताज्या घडामोडीजे बरे होण्याची शक्यता, त्यांच्यावरच उपचार करा- इटली सरकार

जे बरे होण्याची शक्यता, त्यांच्यावरच उपचार करा- इटली सरकार

Subscribe

संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने चीन व ईराणनंतर इटलीत मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. यात आतापर्यंत ईटलीमध्ये २ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून २७००० नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस लागण होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने इटलीतील आरोग्य यंत्रणाही हतबल झाली आहे. रुग्णांच्या तुलनेत इटलीत डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने व अनेक डॉक्टरांनाच करोनाची लागण झाल्याने जे बरे होण्याची शक्यता आहे अशा रुग्णांवरच वेळ न दवडता उपचार करा असा आदेश नाईलाजाने ईटली सरकारला येथील रुग्णालय प्रशासनाला द्यावा लागला आहे.

इटलीतील मिलानमधील एका डॉक्टरनेच ही माहिती दिली असून याआधी कधीही न बघितलेली अशी भयंकर परिस्थिती आज बघायला मिळत असल्याचे म्हटले आहे. मी एक भूलतज्ज्ञ असून मिलान येथील पोलिसक्लिनिको सन डोनाटोत आहे. जे लोबार्डी प्रांतात असून येथेच २१ फेब्रुवारीला करोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आमचे ४० बेडचे रुग्णालय सज्ज झाले. करोनाबरोबर लढण्यासाठी डॉक्टरांची स्पेशल टास्क टीम प्रत्येक रुग्णालयात तैनात करण्यात केली. याआधी कधीही न अनुभवलेले भयंकर सत्य आम्ही बघत होतो. पण बघता बघता देशभरात ३१, ५०६ जणांना लागण झाली. त्यातील २, ९४१ जण बरेही झाले. तर २, ५०३ जणांचा मृत्यू झाला. पण लोबार्डी भागात सर्वाधिक रुग्ण आढळले. येथे १६, २२० जणांना लागण झाली. त्यातील १, ६४० जणांचा मृत्यू झाला. तर ८७९ जण अतिदक्षता विभागात आहेत. पण हा आकडा वाढतोय. यामुळे लवकरच वैद्यकिय यंत्रणा कोलमडेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे या डॉक्टरने सोशल मीडियावर म्हटले आहे. तर दुसऱ्या एका ब्रिटेन नावाच्या डॉक्टरने करोनाने येथे अॅग्रेसिव्ह रुप धारण केल्याने परि्स्थिती हाताबाहेर जात असल्याचे म्हटले आहे. तर एवढ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक असल्याने जे बरे होण्याची शक्यता आहे त्यांच्यावर प्रथम उपचार करा असे आदेशच सरकारला द्यावे लागले आहेत. जेणेकरून लागण झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास सोपे जावे. तसेच सर्वच रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, इटलीत वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणावर करोनाची लागण झाली असून रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने करोनाच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -