घरअर्थजगतGDP RATE : रघुराम राजन दर्जेदार दारू पितात...; भाजप नेत्याची टीका

GDP RATE : रघुराम राजन दर्जेदार दारू पितात…; भाजप नेत्याची टीका

Subscribe

 

नवी दिल्लीः रघुराम राजन हे दुःखी आहेत. शंभर कोटी जनतेला उपाशी बघण्याची त्यांची ईच्छा आहे. ते दर्जेदार दारू पितात आणि भारताच्या गरीबीवर बोलतात, अशी जहरी टीका भाजप नेते अमित मालवीय यांनी केली आहे. भारताचा GDP RATE ७.२ दर झाला असल्याचा अहवाल जाहिर झाला आहे. यावरुन भाजप नेते मालवीय यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

कॉंग्रेस समर्थक हे घाण मागणाऱ्या नेत्यांसारखे आहेत. त्यांना स्वच्छ जागा दिली तरी ते त्यामध्ये घाणच शोधतील, असे ट्वीट भाजप नेते मालवीय केले. भारताचा GDP RATE ५ टक्के जरी झाला तरी आपण भाग्यवंत ठरेल, असे वक्तव्य रघुराम राजन यांनी केले होते. त्यावर मालवीय म्हणाले,  रघुराम राजन हे दुःखी आहेत. शंभर कोटी जनतेला उपाशी बघण्याची त्यांची ईच्छा आहे. ते दर्जेदार दारू पितात आणि भारताच्या गरीबीवर बोलतात.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पुनावाला म्हणाले, रघुराम राजन हे जेम्स बॉण्ड आहेत. सेलिब्रिटी अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वूडू अर्थतज्ज्ञांनाही मर्यादा असतात.

- Advertisement -

हेही वाचाः अमेरिकेत राहुल गांधींसमोर खलिस्तानी घोषणा; भारत, काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

भारताचा GDP RATE ७.२

प्रतिकूल आर्थिक परिस्थितीदेखील भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) चांगली कामगिरी केली आहे. भारताचा जीडीपी जानेवारी-मार्च तिमाहीत 6.1 टक्क्यांनी वाढला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांनी वाढला. 2021-22 मध्ये जीडीपी वाढ 9.1 टक्क्यांनी झाली होती. जानेवारी-मार्च कालावधीतील वाढ 2022-23 च्या मागील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील 4.5 टक्क्यांपेक्षा जास्त राहिली आहे. आर्थतज्ज्ञांनी, जीडीपी वाढीचा दर 4.9 ते 5.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षाही अधिक चांगली कामगिरी बजावली आहे.

रघुराम राजन यांनी व्यक्त केली होती चिंता

येणारं पुढील वर्ष हे भारतासाठी नव्हे तर जगातील अर्थव्यवस्थेसाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे, असे भाकीत रघुराम राजन यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत रघुराम राजन सहभागी झाले होते. त्यावेळी रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्यासोबत भारताच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा केली होती. आर्थिक विकासासाठी अनेक प्रकारे सुधारणा कराव्या लागणार आहेत. निम्न मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून काही धोरणे आखावी लागणार आहेत. कोरोनामुळे खंगलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज आहे, असं रघुराम राजन म्हणाले होते. कोरोना काळात अनेकांना फटका बसला. मात्र, उच्च मध्यमवर्गीयांचं उत्पन्न वर्क फ्रॉम होममुळे वाढले. परंतु, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात असमानता वाढली, असंही रघुराम राजन म्हणाले. देशात आता सेवा क्षेत्रात क्रांती होऊ शकते, असंही ते म्हणाले. तसंच, देशात आता नवीन प्रकारची हरितक्रांती घडत असल्याचंही त्यांनी सांगितले होते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -