घरदेश-विदेशभारताने का माफी मागावी? नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला नेदरलँडमधील खासदाराचा पाठिंबा

भारताने का माफी मागावी? नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला नेदरलँडमधील खासदाराचा पाठिंबा

Subscribe

सगळीकडून नुपूर शर्मा यांच्याविरोधातील वातावरण तयार झालेलं असताना नेदरलँडमधील एका खासदाराने नुपूर यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, या प्रकरणी भारताने का माफी मागावी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रचंड चर्चेत आहेत. आखाती देशांमधून त्यांच्याविरोधात निषेधाचा सूर उमटत आहे. आखाती देशातील वाढता विरोध पाहता नुपूर शर्मा यांना भाजपने पदावरूनही हटवले. सगळीकडून नुपूर शर्मा यांच्याविरोधातील वातावरण तयार झालेलं असताना नेदरलँडमधील एका खासदाराने नुपूर यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, या प्रकरणी भारताने का माफी मागावी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. (Geert Wilders Who Support Nupur Sharma On Prophet Mohammad Controversy)

हेही वाचा – कोण आहेत नुपूर शर्मा? ज्यांच्या एका वक्तव्यामुळे आखाती देशांनी पुकारला भारताविरोधात एल्गार

- Advertisement -

नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स यांनी ट्विट करून नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, अरब आणि इस्लामिक देश नुपूर शर्मा यांच्यावर नाराज आहेत, हे अत्यंत वाईट आहे. नुपूर शर्मा पैगंबर मोहम्मदबद्दल सत्य बोलल्या. ज्यांनी खरंच आयशा या सहा वर्षांच्या मुलीसोबत लग्न केले. मग भारत माफी का मागतो?


कतार, कुवैत, पाकिस्तान, इंडोनेशियासह १० पेक्षा जास्त मुस्लिम देशांनी नुपूर शर्मांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करत धमक्या देण्यात आल्या आहेत. अनेक मुस्लिम बहुल देशात भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्माला पोलीस नोटीस पाठविणार, वादग्रस्त विधानासंदर्भात लवकरच पोलिसांकडून चौकशी

कोण आहेत गिर्ट विल्डर्स

गिर्ट विल्डर्स हे नेदरलँडमधील पार्टी फॉर फ्रिडम या पक्षाचे संस्थापक आहेत. नेदरलँडमधील हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. १९९८ साली ते खासदार झाले. ते कट्टर इस्लामविरोधी असून त्यांनी आपल्या देशात बॅन इस्लाम नावाचं अभियानही चालवलं होतं. ज्या अंतर्गत त्यांनी मशिदी बंद करण्याची मागणी केली होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -