घरदेश-विदेशGem Online Marketplace: Aamzon- Flipkart पेक्षा 'या' सरकारी वेबसाईटवर मिळतात स्वस्तात वस्तू

Gem Online Marketplace: Aamzon- Flipkart पेक्षा ‘या’ सरकारी वेबसाईटवर मिळतात स्वस्तात वस्तू

Subscribe

Gem ही एक सरकारी बाजारपेठ आहे. जिथे ग्राहक त्यांच्या सर्वात वाजवी दरात उत्पादनं खरेदी करु शकतात. उत्तम दर्जाची उत्पादनेही येथे उपलब्ध आहेत. या बाजारपेठेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

गेल्या काही वर्षांत ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. लोक स्वत: बाजारात जाऊन कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याऐवजी थेट स्मार्टफोनच्या एका क्लिकवर थेट घरीच वस्तू मागवत आहे. ऑनलाईन शॉपिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू. त्यामध्ये पण Amazon आणि Flipkart वर अनेक वस्तूंवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळतो. बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास बाजाराच्या तुलनेत या प्लॅटफॉर्मवर वस्तू खूपच स्वस्तात मिळतात. ( Gem Online Marketplace Cheaper than Amazon Flipkart on Gem Online Marketplace government website )

Gem ही एक सरकारी बाजारपेठ आहे. जिथे ग्राहक त्यांच्या सर्वात वाजवी दरात उत्पादनं खरेदी करु शकतात. उत्तम दर्जाची उत्पादनेही येथे उपलब्ध आहेत. या बाजारपेठेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

- Advertisement -

समोर आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास 10 असे प्रोडक्स आहेत जे या वेबसाईटवर कमी किंमतीत उपलब्ध आहेत. खास गोष्ट म्हणजे या साईट व्यतिरिक्त कुठेही हे प्रोडक्ट्स एवढ्या स्वस्तात मिळत नाहीत.

2021-22 मध्ये झालेल्या इकोनॉमिक सर्वेक्षणानंतर Gem या सरकारी ई-मार्केटप्लेसवर स्वस्तात उपलब्ध आहेत, याची माहिती अनेकांना मिळाली. अनेक उपयोगी वस्तूंसाठी येथे खूपच कमी पैसे खर्च करावे लागतात.

- Advertisement -

कमी किंमतीत वस्तूंची गुणवत्ता चांगली असेल की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सर्व प्रोडक्ट्सची क्वालिटी खूपच चांगली असते. इकोनॉमिक सर्वेक्षणादरम्यान एकूण 22 प्रोडक्ट्सचा समावेश होता तुलना केली गेली. यामध्ये या पोर्टलवर उपलब्ध प्रोडक्ट्सह अन्य ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट्सचा समावेश होते.

( हेही वाचा: अजून काही असेल तर हायकोर्टात जा…; सर्वोच्च न्यायालयाचा पहिलवानांना सल्ला )

यापैकी 10 वस्तू अशा होत्या त्यांची किंमत अन्य प्ल‌‌ॅटफॉर्म्सच्या तुलनेत 9.5 टक्के कमी होती. त्यामुळे या सरकारी साइटवरुन वस्तू खरेदी करणे नक्कीच फायद्याचं ठरेल. या व्यतिरिक्त Shopsy, Meesho आणि Snapdeal देखील असे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत, जिथून तुम्ही Amazon आणि Flipkart च्या तुलनेत खूपच स्वस्तात वस्तू खरेदी करु शकता. या वस्तूंची क्वालिटी देखील चांगली असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -