घरताज्या घडामोडीअमेरिकेने वातावरणात सोडले दीड लाख कृत्रिम डास, कारण...

अमेरिकेने वातावरणात सोडले दीड लाख कृत्रिम डास, कारण…

Subscribe

प्रयोगाला बिल गेट्स मार्फत अर्थसहाय्य

डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेत आता जेनेटिकली मॉडिफाईड डासांचा प्रयोग होत आहे. डासांच्या उत्पत्ती थांबवण्यासाठी आणि डासांवरील नियंत्रणासाठी हा प्रयोग बिल गेट्स फाऊंडेशनच्या बायोटेक कंपनीकडून करण्यात येत आहे. या बायोटेक कंपनीने जवळपास १ लाख ५० हजार जेनेटिकली मॉडिफाईड डास हे वातावरण सोडले आहेत. ऑक्सिटेक या युकेतील कंपनीने या कृत्रिम डासांचा प्रयोग ब्राझील, मलेशिया, पनामा आणि केमॅन आयलॅंड येथे केला आहे. पण अमेरिकेतील नियामकामार्फतच्या मंजुरीसाठी कंपनीने अर्ज केला होता. त्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे. या संशोधनासाठी बिल गेट्स फाऊंडेशनने मदत केली आहे.

हे डास कसे काम करतात ?

नव्या संशोधनानुसार संशोधकांनी बायोइंजिनिअरींगमध्ये डासांमध्ये एडिस या पुरूष प्रजातींचा मिलाप वातावरणात वन्य क्षेत्रातील मादींसोबत घडवून आणला जातो. एडिसच्या मादी डासांमार्फत डेंग्यू आणि मलेरिया फैलाव होत असतो. जेनेटिकली इंजिनिअर केलेल्या डासांमुळे नव्याने जन्माला येणारे डासांचे आयुष्यमान कमी होते. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि वाढ होण्यापासून नियंत्रण मिळवता येते. मादी डासांची संख्या कमी होण्यासाठी या जेनेटिकली मॉडिफाईड डासांची मदत होते. पण तुलनेत पुरूष डासांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्यानेच हे डास पुढच्या पिढ्यांमध्ये मलेरिया, डेंग्यूचा प्रसार करतात असे निदर्शनास आले आहे. या नव्या संशोधनामुळे एडिसच्या मादी डासांची संख्या भविष्यात मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते असा संशोधकांचा दावा आहे.

- Advertisement -

या जेनेटिकली मॉडिफाईड डासांपासूनची नवी डासांची प्रजाती आगामी दोन आठवड्यांमध्ये तयार होणे अपेक्षित आहे. सरासरी १२ हजार इतक्या प्रमाणात कृत्रिम डास आगामी १२ आठवड्यांमध्ये वातावरणात सोडण्यात येतील. तर आगामी १६ आठवड्यांमध्ये २ लाख इतक्या प्रमाणात डास वातावरण्यात सोडण्याचे उदिष्ट कंपनीने ठेवले आहे.

डास ट्रॅक कसे होतात ?

एखाद्या विशिष्ट रंगाच्या संपर्कात आल्यानंतर हे डास ट्रॅक करणे शक्य आहे. त्यासाठीच संशोधकांनी कॅप्चर डिव्हाईसचा वापर केला आहे. त्यामुळे हे डास ट्रॅक करणे शक्य होते. तसेच डासांमध्ये फ्लुरोसंट मार्कर जिनचा वापर करण्यात आला आहे. म्हणूनच हे डास ट्रॅक करणे शक्य होते. या डिव्हाईसमधून आलेले निष्कर्ष अमेरिकेच्या पर्यावरण सुरक्षा एजन्सीकडे देण्यात येणार आहे. या निष्कर्षामुळे देशातील इतर डासांचा प्रभाव असलेल्या भागातही अशा कृत्रिम डासांचा वापर करता येईल का ? या गोष्टीसाठी मदत होणार आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -