गेम चेंजर ! आता घरबसल्या करा कॅन्सरची स्क्रिनिंग, कृत्रिम कृमींचा प्रयोग यशस्वी

GM worms to detect cancer

पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या बाबतीत असणारी लक्षणे ही एरव्ही लवकर माहिती पडत नाहीत. अनेकदा चाचणीत झालेल्या विलंबामुळेच कॅन्सवरील उपचारात दिरंगाई होते. पण गेम चेंजर असे संशोधन जपानच्या एका कंपनीने या कॅन्सरच्या चाचणीसाठी यशस्वी करून दाखवले आहे. त्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड कृत्रीम कृमींचा वापर हा कॅन्सरच्या स्क्रिनिंगसाठी करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या फक्त युरीनच्या घरगुती चाचणीतून ही कॅन्सरची स्क्रिनिंग करणे शक्य होईल.

पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या आगाऊ लक्षणांबाबत माहिती मिळवण्यासाठीची सूक्ष्म कृमींचा वापर करत लघवीची स्क्रिनिंग टेस्ट जपानच्या एका बायोटेक कंपनीने विकसित केली आहे. दैनंदिन स्क्रिनिंगसाठी ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे. एखाद्या उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत कर्करोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील टाकाऊ बॉडीली फ्लुईड्ससाठी विशिष्ट असा वास असतो हे वैज्ञानिकांनी संशोधनातून शोधले आहे. या संशोधनात श्वानांचा वापर करत आजाराबाबतचे लक्षणे ही श्वासोश्वातून किंवा युरीन सॅम्पलमधून शोधण्यासाठीचा प्रयोग संशोधकांनी केला होता. त्यामध्येच कर्करोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींबाबतचा हा खुलासा झाला होता.

कृमींचे जेनेटिकली मॉडिफाईड नाव काय ?

हिरोस्तु बायो सायन्सने जेनेटिकली मॉडिफाईड वोर्म म्हणजे कृमींच्या माध्यमातून कर्करोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींबाबतची चाचणी विकसित केली आहे. या सूक्ष्म कृमींना C.elegans असे नाव या जेनेटिकली मॉडिफाईडड कृमींना देण्यात आले आहे. एक मिलीमीटर इतक्या लांबीच्या या कृमी आहेत. या जेनेटिकली मॉडिफाईड कृमींचे वैशिष्ट्य म्हणजे पॅनक्रियाटिक कर्करोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत वासाच्या माध्यमातूनच या कृमी रिएक्ट होतात. एरव्ही या कर्करोगाची लक्षणे माहिती व्हायला खूपच वेळ लागतो. पण चाचणीमुळे ही लक्षणे आगाऊ शोधण्यासाठी मदत होते.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून ही अतिशय महत्वाची अशी घडामोड असल्याचे मत कंपनीचे सीईओ तक्काई हिरोस्तू यांनी व्यक्त केले आहे. त्यांनीही अभ्यासाचा भाग म्हणून सूक्ष्म कृमींच्या माध्यमातून संशोधन केले होते. याआधी टोकयोच्या एका संस्थेने कृमींचा वापर करत कर्करोगाची स्क्रिनिंग टेस्ट करण्याचा प्रयोग केला आहे. पण नवीन चाचणी ही फक्त पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या पडताळणीसाठी मर्यादित नाही, तर दैनंदिन स्क्रिनिंगसाठीही या चाचणीचा वापर करता येणार आहे. फक्त युरीन सॅम्पल जमा करून ही चाचणी करता येईल. त्यामुळे हॉस्पिटलला मारावी लागणारी फेरी टाळता येईल. जर या सूक्ष्म कृमींपासून काही संकेत मिळाले की डॉक्टरकडे पुढील उपचारासाठी जाता येईल.

 संशोधनात काय ?

या चाचणीमुळे जपानमध्ये कॅन्सरबाबत माहिती मिळण्याची आकडेवारी सुधारेल, असाही विश्वास हिरोस्तु यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाकाळात अनेक लोकांनी चाचण्या टाळल्याने स्क्रिनिंगची संख्या कमी झाली होती. कोरोनाच्या आधीही लोकांकडून कॅन्सरचे स्क्रिनिंग अतिशय कमी प्रमाणात करण्यात येत होते. पण ही चाचणी गेमचेंजर ठरेल असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबतच्या अभ्यास ऑन्कोटार्गेट या जरनलमध्ये प्रकाशित झाला होता. या अभ्यासादरम्यान २२ युरीन सॅम्पलच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्तांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये कॅन्सरला सुरूवात झालेल्या रूग्णांचाही समावेश होता.

श्वानांच्या माध्यमातून कॅन्सरचे निदान 

याआधी न्यूझीलंडच्या वायकाटो विद्यापिठात मानसशास्त्र विभागाच्या टीम एडवर्ड वरिष्ठ प्राध्यापकाने केलेल्या अभ्यासात श्वानाची कॅन्सरच्या शोधासाठी मदत घेता येऊ शकते असा अभ्यास केला होता. त्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग शोधण्यासाठी श्वानाची मदत घेण्यात आली होती. श्वासाच्या माध्यमातून श्वान ही चाचणी करू शकत होता. त्याचप्रमाणे कृमींचा वापर करून होणारी चाचणीही उपयुक्त ठरू शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जंतूंना कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज नाही, त्यामुळे चाचणीसाठी हा पर्याय अतिशय उपयुक्त ठरू शकतो असेही मत एडवर्ड्स यांनी मांडले आहे.