घरदेश-विदेश३०० चित्रपटाचा अभिनेता गेराल्ड बटलरच्या घराला आग

३०० चित्रपटाचा अभिनेता गेराल्ड बटलरच्या घराला आग

Subscribe

३०० या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या हॉलिवूडचा अभिनेता गेराल्ड बटलरचे घर वणव्यात जळून खाक झाले. कॅलिफोर्नियात भडकलेल्या वणव्यामुळे एक लाख लोकांना आतापर्यंत विस्थापित व्हावे लागले आहे.

आहु, आहु असे म्हणत आपल्या चिमूटभर सैन्यांना लाखांच्या विरोधात लढायला लावणारा लियोनायडस तुम्हाला माहितच असेल. ३०० चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडचा अभिनेता गेराल्ड बटलरने स्पार्टा नावाच्या राज्याच्या राजाची भूमिका वठवली होती. लियोनायडस आपले राज्य, घर वाचवण्यासाठी मोठ्या साम्राज्याला भिडतो. मात्र रियल लाईफमधल्या लियोनायडसच्या घरावरही अशीच अनामिक संकट कोसळले आहे. अभिनेता गेराल्ड बटलरचे मलिबू येथील घर आगीत जळाले आहे.

गेराल्डने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करुन आपल्या जळालेल्या घराची अवस्था लोकांना दाखवली आहे. त्यात तो म्हणाला की, “शनिवारी माझ्या परिसरात मी फिरत असताना मला कॅलिफॉर्नियाच्या मलिबू येथील घरे जळालेली दिसली. अनेकांची घरे जळून राख झाली आहेत. मी नशीबवान होतो म्हणून माझ्या घराचे तेवढे नुकसान झालेले नाही. आता आपण सर्वांनी एकत्र येत आपले घर बांधायचे आहे.”

- Advertisement -

कॅलिफोर्नियाच्या मलिबू प्रांतात भडकलेल्या आगीमुळे या परिसरातील अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये गेराल्ड बटलर, मीली सायरस आणि रॉबिन थिक यांचाही समावेश आहे. दि. ८ नोव्हेंबर रोजी पसरलेल्या वणव्यामुळे आतापर्यंत २९ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या आगीला ‘कॅम्प फायर’ असे नाव देण्यात आले असून उत्तर आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील जवळपास ३ लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

- Advertisement -

अमेरिकन गायिका मीली सायरस म्हणाली की, “माझे घर आता राहिलेले नाही. मात्र माझ्या आणि कुटुंबियांच्या आठवणी ताज्या आहेत. माझ्याकडे जे काही उरले आहे, त्याबद्दल मी आनंदी आहे. जे आग शमवण्यासाठी अहोरात्र काम करत होते, त्यांचे आभार व्यक्त करते.”

अभिनेता गेराल्ड बटलर आणि मीली सायरसने आगीत नुकसान झालेल्यांना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -