Germany 4th wave: लस न घेणाऱ्यांमुळे जर्मनीत कोरोनाची चौथी लाट, १ लाख मृत्यू होण्याची भीती

Germany 4th wave Unvaccinated people lead Covid 4th wave in Germany Report
Germany 4th wave: लस न घेणाऱ्यांमुळे जर्मनीत कोरोनाची चौथी लाट, १ लाख मृत्यू होण्याची भीती

जर्मनमध्ये कोरोना महामारीची महाभयंकर स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या महामारीला कोरोनाविरोधी लस न घेतलेले नागरिक जबाबदार आहेत. अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, जर्मनी देश पुन्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेत अडकतोय. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, जर्मनीतील कोरोना रुग्णसंख्या अलीकडच्या आठवड्यात तिप्पट झाली आहे. यापैकी जवळपास निम्मे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणाचेही लसीकरण झालेले नाही. यामुळे कोरोनाची चौथ्या लाट थांबवण्यासाठी काहीच पाऊले उचलली गेली नाही तर जर्मनीत १ लाख लोकांचा मृत्यू होईल अशी भीती विषाणूतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

२०२० मध्ये कोरोना महामारीला सुरुवात झाली तेव्हापासून देशात गुरुवारी पहिल्यांदाच ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. या रुग्णांमध्ये ५०,१९६ अशी विक्रमी वाढ झाली आहे. तर १००,००० लोकांमागे सात दिवसांतील घटनांचा दर २४९.१ वर गेला आहे. तर मृत्यू २३५ ने वाढून एकूण ९७,१९८ वर पोहोचले आहेत. अशी माहिती RKI पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीत आहे.

जर्मनी त्या काही देशांपैकी एक होता ज्यांनी व्यापक कोरोना टेस्ट आणि विविध उपचारांसह कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे जर्मनासाठी परिस्थिती पुन्हा संकटात नेण्यासारखी आहे.

देश राजकीय संकटाशी झुंज देत असताना, लसीकरणाच्या थिम्या मोहिमेमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होतेय. विशेषत: जर्मनीमध्ये तरुण वयोगटातील लोकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या वृद्ध लोकांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. परंतु तरुण वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तसेच लसीकरणानंतर तरुणांना संसर्गाचा धोका कमी होतोय.

गुरुवारी जर्मनीतील कुलगुरु चान्सलर अँजेला मर्केल म्हणाल्या की, जर्मनीतील बहुतांश लोकांनी लसीकरण पूर्ण न केल्याने देशाला कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेने ग्रासला आहे. त्यामुळे नागरिकांनी परिस्थिती समजून घेत लस घेऊन इतरांचे आणि स्वत:चे संरक्षण केले पाहिजे आणि हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याशिवाय लसीकरण पूर्ण न झालेल्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.