घरदेश-विदेशGerman election: जर्मनीत सत्तांतर, अँजेला मार्केल यांच्या पक्षाचा पराभव

German election: जर्मनीत सत्तांतर, अँजेला मार्केल यांच्या पक्षाचा पराभव

Subscribe

जर्मनीत रविवारी संसदेच्या सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडल्या. या निवडणूकीच्या निकालानंतर चॅन्सेलर अँजेला मार्केल यांच्यानंतर देशाचे नवे चॅन्सेलकर कोण हे ठरणार होते. त्यामुळे जर्मनीच्या संसदीय निवडणूकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. अशातच जर्मन सार्वत्रिक निवडणूकीत चान्सलर अंजेला मार्केल यांच्या उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन डेमॉक्रेटिक युनियन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सध्या या निवडणुकीनंतरचे निकाल सध्या हाती येत आहेत. जर्मनीचा डावा पक्ष असलेला सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ जर्मनीला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे मार्केल यांच्या पक्षाला २००५ पासून ते आत्तापर्यंत १६ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.

सेंटर लेफ्ट सोशल डेमोक्रेटिक (SPD) पक्षाला २५.५ टक्के मत मिळाली आहे. तर मर्केल यांच्या सीडीयू, सीएसयू कंझर्व्हेटीव्ह आघाडीला २४.५ टक्के मतं मिळाली आहे. तर ग्रीन पार्टी १४. ८ टक्के मतं मिळून तिसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. यामुळे जर्मनीत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नसून नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी करण्याची गरज भासणार आहे. यामुळे जर्मनीतील युती सरकारमध्ये ग्रीन पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण सरकार स्थापनेसाठी ग्रीन आणि लिबरल फ्री डेमोक्रेटिक (एफडीपी) पक्षाची गरज भासणार आहे.

- Advertisement -

गेली १६ वर्षे अँजेला मार्केल यांनी जर्मनीवर सत्ता केली. चार वेळी त्यांची चान्सेलर म्हणून निवड झाली. मात्र २०१८ मध्ये त्यांनी पाचव्यांदा मी या स्पर्धेत नसेल असे जाहीर केले. त्यामुळे जर्मन नागरिकांनी रविवारी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मतदान केले. यामुळे विरोधी पक्षाला सर्वाधिक मतदान मिळाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -