Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोना लस घ्या, सोन्याची नथ मिळवा; गुजरातच्या ज्वेलर्सचा सॉलिड फंडा

कोरोना लस घ्या, सोन्याची नथ मिळवा; गुजरातच्या ज्वेलर्सचा सॉलिड फंडा

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत असल्यामुळे लसीकरण्याच्या मोहिमेचा वेग वाढविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना लस जास्तीत जास्त लोकांनी घेण्यासाठी गुजरातच्या ज्वेलर्सने भन्नाट युक्ती लढविली आहे. कोरोना लस घेणाऱ्या प्रत्येकांसाठी या ज्वेलर्सकडून खास गिफ्ट देण्यात येत आहे. यामुळे गुजरातमधील लोकांचा लस घेण्यासाठी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

गुजरातमधील राजकोट येथील लसीकरण केंद्रावर ज्वेलर असोसिएनद्वारे लस घेण्याऱ्या व्यक्तीला गिफ्ट दिले जात आहे. यासाठी स्वतः पुढाकार घेऊन ज्वेअर असोसिएनने कँप लावला असून येथे महिलांसाठी सोन्याची नथ आणि पुरुषांसाठी हँडब्लेंडर गिफ्ट म्हणून देण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान गेल्या २४ तासांत गुजरातमध्ये २ हजार ८७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार २४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आता गुजरात मधील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १८ हजार ४३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ हजार ५६६ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ९८ हजार ७३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona Vaccination : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नव्याने नोंदणी थांबवा; केंद्राचे राज्यांना आदेश


- Advertisement -

 

- Advertisement -