अल्पसंख्याकांचं आयुष्य धोक्यात, मोदींची हत्या करायला तयार राहा; काँग्रेसचा नेता बरळला

PM Modi Murder | हा व्हिडीओ समोर येताच भाजपा नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पन्नाच्या पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जनसभेत धर्म, जाती आणि भाषाच्या आधारावर अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासी समुदायात तेढ निर्माण करण्यात आला आहे.

पन्ना – मोदी निवडणुका संपवून टाकतील. मोदी धर्म, जाती, भाषाच्या आधारावर विभागणी करतील. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचं आयुष्य धोक्यात आहे. संविधान वाचवायचं असेल तर मोदींची हत्या करायला तयार राहा, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याने केलं आहे. भरसभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेसचे नेते राजा पटेरिया मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असं बोलले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभर खळबळ माजली असून भाजपा समर्थकांकडून राजा पटेरिया यांच्यावर टीका केली जात आहे.

हेही वाचा – महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही…; राज्यपाल कोश्यारींचे अमित शाहांना पत्र

राजा पटेरिया रविवारी पन्ना येथे काँग्रेसच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलत होते. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनुसार, मोदी निवडणुका संपवून टाकतील, मोदी धर्म, जाती, भाषाच्या आधारावर विभागणी करतीस, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचं आयुष्य धोक्यात आहे, संविधान वाचवायचं असेल तर मोदींची हत्या करायला तयार राहा. हत्या म्हणजेच त्यांना हरवण्याचं काम करा, असंही राजा पटेरिया म्हणाले.

हा व्हिडीओ समोर येताच भाजपा नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पन्नाच्या पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जनसभेत धर्म, जाती आणि भाषाच्या आधारावर अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासी समुदायात तेढ निर्माण करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयपीएस धारा ४५१, ५०४, ५०५, ५०६, १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


भारत जोडो यात्रा काढणाऱ्यांचं ढोंग समोर येत आहे. नरेंद्र मोदी जनतेच्या मनात आहेत. मोदींबाबत आस्था आणि श्रद्धा बाळगली जाते. काँग्रेसच्या नेत्यांना मैदानात उतरणे कठीण आहे. म्हणूनच मोदींच्या हत्येबाबत बोललं जात आहे. द्वेषाची पराकाष्ठा आहे. काँग्रेसचा मूळ स्वभाव आता समोर येत आहे. असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा घणाघात मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी केला आहे.