Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश मोफत लसीकरण करा अन्यथा १ मे रोजी आंदोलन करु; कामगार संघटनांचा केंद्राला...

मोफत लसीकरण करा अन्यथा १ मे रोजी आंदोलन करु; कामगार संघटनांचा केंद्राला इशारा

Related Story

- Advertisement -

देशात लसीकरण मोहीम सुरु असून येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना देखील लस दिली जाणार आहे. हे लसीकरण मोफत करावं अशी मागणी देशातील कामगार संघटनांनी केली आहे. याशिवाय, १ मे रोजी कामगार दिनी सरकारच्या कामगार-विरोधी, शेतकरी-विरोधी आणि जनता-विरोधी धोरणांना विरोधात कामगार संघटना आंदोलन करणार आहेत. यामध्ये १० संघटनांचा समावेश आहे.

कामगार संघटनांच्या या संयुक्त मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यामध्ये केंद्राच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आहे. तसंच काही मागण्या देखील कामगार संघटनांनी केल्या आहेत. देशात मोफत लसीकरण करण्यात यावं. तसंच गरीब परिवारांना दरमहा ७५०० रुपये आणि १० किलोग्राम मोफत धान्य द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या १ मे रोजी कामगार दिनी सरकारच्या कामगार-विरोधी, शेतकरी-विरोधी आणि जनता-विरोधी धोरणांना विरोधात कामगार संघटना आंदोलन करणार आहेत.

- Advertisement -

कामगार संघटनांच्या संयुक्त मंचामध्ये १० संघटना आहेत. यात नॅशनल ट्रेड यूनियन काँग्रेस (INTUC), ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेस (AITUC), हिंद मजूर सभा (HMS), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन (CITU), ऑल इंडिया यूनाइटेड ट्रेड यूनियन सेंटर (AIUTUC), ट्रेड यूनियन को-ऑर्डिनेशन सेंटर (TUCC), सेल्फ-एंप्लॉयड वुमेन्स असोसिएशन (SEWA), ऑल इंडिया सेंट्रल काउंसिल ऑफ ट्रेड यूनियंस (AICCTU), लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन (LPF) आणि यूनाइटेड ट्रेड यूनियन काँग्रेस (UTUC) सहभागी होणार आहेत.

 

- Advertisement -