घरदेश-विदेश10 दिवसात करणार नव्या पक्षाची घोषणा, बारामुल्ला येथील सभेत गुलाम नबी आझाद...

10 दिवसात करणार नव्या पक्षाची घोषणा, बारामुल्ला येथील सभेत गुलाम नबी आझाद यांनी केले जाहीर

Subscribe

बारामुल्ला – काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी आज जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे एक जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी येत्या 10 दिवसात नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे सांगितले. गेल्या 3 वर्षात जम्मू- काश्मीरमध्ये अनेक आपत्तीजनक घटना घडल्या असून भारतीय इतिहाराप्रमाणे काश्मीरही आक्रमकांनी उद्ध्वस्त केले असल्याचे आझाद म्हणाले.

मुघलांनी 800 वर्ष राज्य केले आणि ब्रिटिशांनी 300 वर्षे राज्य केले. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये हजारो राज्यकर्ते आणि आक्रमणकर्ते झाले आहेत. जम्मू- काश्मीरला सर्वांनी लुटले आणि स्वातंत्र्यांनंतर ते अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले असे, गुलाब नबी आझाद यांनी सांगितले. पुढे आझाद यांनी तीन दिवसांपासून 300 हून अधिक शिष्टमंडळांची भेट घेतली. दोडा येथे त्यांचे समर्थकांनी जंगी स्वागत केले. यावेळी त्यांनी डोडामध्ये जम्मूच्या लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली. जम्मू-काश्मीरमधील जनतेवर अन्याय होत असून त्याविरोधात आवाज उठवला जाईल, असे ते म्हणाले.

- Advertisement -

शुक्रवारी किश्तवाडमधील रॅलीदरम्यान त्यांनी आपल्या प्रस्तावित नव्या पक्षाचा अजेंडा सर्वांसमोर ठेवला. यावेळी आपण नवा पक्ष काढणार असून जम्मू-काश्मीरमधील भागात जाऊन लोकांचे मत जाणून घेणार आहे. लोकांच्या समस्या ऐकणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. यावेळी जनतेशी चर्चा करूनच पक्षाचे नाव ठेवले जाईल, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे आणि स्थानिक लोकांच्या नोकरी आणि जमिनीच्या अधिकारांचे संरक्षण करणे या नवीन पक्षाच्या अजेंडाच्या संदर्भात परिस्थिती स्पष्ट आहे, असे ते म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -