घरताज्या घडामोडीगुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, झेंड्याचेही केले अनावरण

गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, झेंड्याचेही केले अनावरण

Subscribe

काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली आहे. गुलाम नबी आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाला डेमोक्रेटिक आझाद पार्टी असे नाव दिले आहे. आज जम्मू येथे पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचे अनावरणही केले.

आपल्या नव्या पक्षाच्या नावाबाबत गुलाम नबी आझाद म्हणाले की, उर्दू, संस्कृतमध्ये सुमारे 1,500 नावे आम्हाला पाठवण्यात आली होती. हिंदुस्थानी हे हिंदी आणि उर्दूचे मिश्रण आहे. पक्षाचे नाव लोकशाही, शांतताप्रिय आणि स्वतंत्र असावे अशी आमची इच्छा होती, म्हणून पक्षाला हे नाव देण्यात आलं असं त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

आझाद यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. ध्वजाच्या तीन रंगांविषयी माहिती देताना ते म्हणाले की, मोहरीचा रंग विविधतेतील सर्जनशीलता आणि एकता दर्शवतो, पांढरा रंग शांतता दर्शवतो आणि निळा रंग स्वातंत्र्य, मोकळी जागा, कल्पनाशक्ती आणि समुद्राच्या खोलीपासून आकाशाच्या उंचीपर्यंतच्या मर्यादा दर्शवतो.

- Advertisement -

२६ ऑगस्ट रोजी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. जवळपास पाच वर्ष ते काँग्रेसममध्ये होते. गांधी घराण्याच्या जवळचे अशीही त्यांची ओळख होती. परंतु त्यांनी पक्षाविषयी नाराजी व्यक्त करत सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी पक्षातील सर्व पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला.


हेही वाचा : रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 7 मुलांसह 13 जणांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -