जम्मू- काश्मीरमध्ये काढणार स्वत:चा पक्ष; राजीनाम्यानंतर आझाद यांचा मोठा निर्णय

ghulam nabi azad said after resign he will form his own party in jammu kashmir

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. अशात आझाद यांनी मोठी घोषणा केली आहे. मी जम्मू-काश्मीरला जात असून जम्मू-काश्मीरमध्ये आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याचा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला, यासोबतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

गुलाम नबी आझाद म्हणाले की, ‘विरोधक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत की, मी भाजपमध्ये जातोय. पण मी जम्मू-काश्मीरला जात आहे. मी जम्मू-काश्मीरमध्ये माझा पक्ष स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद बराच काळ पक्षाच्या धोरणांबद्दल नाराज होते. ज्यानंतर अखेर आज त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनाम्याचे पाच पानी पत्र दिले आहे. या पत्रात आझाद यांनी जड अंत:करणाने हे पाऊल उचलत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारत जोडो यात्रेपूर्वी ‘काँग्रेस जोडो यात्रा’ काढायला हवी होती, पक्षात कोणत्याही पातळीवर निवडणुका झाल्या नाहीत. काँग्रेसने लढण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता गमावली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आझाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, एआयसीसीच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना एआयसीसीचे संचालन करणाऱ्या छोट्या गटाने तयार केलेल्या याद्यांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले होते. पक्षाच्या प्रचंड विश्वासघाताला सर्वस्वी नेतृत्व जबाबदार आहे. काँग्रेसची परिस्थिती आता अशा स्थितीत पोहोचली आहे जिथून परत येणे शक्य नाही. पक्षाच्या ढासळलेल्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकण्यासाठी पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांना शिवीगाळ, अपमान, अपमानित करण्यात आले.

गुलाम नबी आझाद यांनी मिळणार नाही सन्मान

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हणाले की, पहिल्यासारखा त्यांना सन्मान मिळत नसेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून इनर कॅबिनेटचे सदस्य होते. आजही ते सोनिया गांधींच्या जवळचे होते. त्यांच्या राजीनाम्याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे.

त्याचवेळी फारुख अब्दुल्ला म्हणाले, ‘त्याला (आझाद) सन्मान मिळत नसावा. 32 नेत्यांनी पत्र लिहिल्याने काँग्रेस आश्चर्यचकित झाली. पण यापूर्वीही असे घडले आहे, परंतु काळाच्या ओघात काँग्रेस मजबूत होत आहे. देशाला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे.


काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचा पत्ता कट?