Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश आधी व्हेलेंटाईन गिफ्ट नंतर गळा दाबून हत्या

आधी व्हेलेंटाईन गिफ्ट नंतर गळा दाबून हत्या

Related Story

- Advertisement -

व्हॅलेंटाइन डे दिवशी पती पत्नीला गिफ्ट घेऊन आला मात्र यावेळी पत्नी घरात नव्हती. पतीने पत्नीची खूप शोधाशोध सुरु केली. याचदरम्यान पत्त्नी प्रियकरासोबत फिरत होती. हे पाहून रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणात घडली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ही घटना घडली असून आरोपी पतीचे नाव सतीश आहे. पोलिसांनी सतीशला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आपल्या पत्नीवर संशय घेत होता. कारण त्याची पत्नी रुबी सतत दुसऱ्या परपुरुषासोबत फोनवर बोलत राहायची. त्यामुळे पत्नीचे रुबीचे अफेयर सुरु असल्याचा त्याला संशय होता. त्यानंतर १४ फेब्रुवारीलाही पत्नी परपुरुषासोबत फिरताना त्याला दिसली व ती घरी आल्यानंतर पतीने रात्री उशीरा पत्नी रुबीची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

सतीश आणि रुबीने आठ वर्षीपूर्वी लग्न केले. त्यांना आता दोन मुलंही आहेत. पण पतीने आपल्या पत्नीवर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण होण्यास सुरुवात झाली. १४ फेब्रुवारीला व्हेंलटाइन डे निमित्त त्याने पत्नी रुबीसाठी स्पेशल गिफ्ट आणले होते. गिफ्ट दिल्यानंतर पती सतीश काही कामासाठी घराबाहेर गेला. पण ते काम संपवून पुन्हा घरी आला तेव्हा पत्नी घरी नव्हती. याचदरम्यान तो पत्नी रुबीचा शोध घेत होता. त्यानंतर तो शोध घेत एका ठिकाणी पोहचला त्यावेळी पत्नी परपुरषासोबत त्याला दिसली. तिथे तिघांमध्ये वाद सुरु झाले. हे वाद इतके टोकाला गेले की, सतीशने पत्नी रुबीची गळा दाबून हत्या केली.


हेही वाचा- नायजेरियात मुलींच्या शाळेवर दहशतवादी ह्ल्ला, ३०० हून अधिक विद्यार्थीनींचे अपहरण

- Advertisement -