घरताज्या घडामोडीभर संसदेत महिला खासदाराने बाळाला... आईचं कौतुक करत टाळ्यांचा कडकडाट

भर संसदेत महिला खासदाराने बाळाला… आईचं कौतुक करत टाळ्यांचा कडकडाट

Subscribe

आईच्या मायेला कोणती सिमारेषा नसते. आईची माया कुठेही जागृत होऊ शकते. इटलीच्या एका महिला खासदारने कौतुकास्पद कामगिरी केल्यामुळे भर संसेदत खासदारांनी कौतुक करत त्यांच्यासाठी टाळ्यांचा वर्षाव केला. खासदार गिल्डा स्पोर्टिएलो यांनी भर संसदेत आपल्या बाळाला स्तनपान केले आहे. त्यामुळे संसदेत आपल्या मुलाला स्तनपान करणाऱ्या त्या पहिल्या राजकीय महिला ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

इटलीच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह हे पुरुष प्रधान मानले जाते. संसदेत मतदान करण्यासाठी गिल्डा स्पोर्टिएलो आपल्या मुलाला घेऊन आल्या होत्या. त्यांनी आधी मतदान केले आणि आपल्या बाळाला घेऊन एका बाकावर गेल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या बाळाला दूध पाजले. हे सर्व होत असतानाच सर्व खासदारांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

- Advertisement -

संसदीय अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असलेले जॉर्जिओ म्हणाले की, सर्व पक्षांच्या पाठिंब्याने एखाद्या महिलेने आपल्या बाळाला स्तनपान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. इटलीच्या डाव्या विचारसरणीच्या फाइव्ह-स्टार मूव्हमेंट पार्टीशी संबंधित गिल्डा स्पोर्टिएलो म्हणाल्या की, अनेक महिला वेळेअभावी बाळांना स्तनपान करत नाहीत किंवा त्या टाळतात. अनेक महिला वेळेपूर्वीच बाळांना स्तनपान करणे थांबवतात. अनेक महिलांना कामावर जायचे असते, त्यामुळे त्या हा निर्णय घेतात.

- Advertisement -

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इटलीच्या इतिहासात प्रथमच, जॉर्जिया मेलोनी यांनी महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. इटलीत दोन तृतीयांश खासदार पुरुष आहेत. पण बुधवारी घडलेली घटना इटलीमध्ये प्रथमच घडली आहे. याआधी तेरा वर्षांपूर्वी लिसिया रोन्झुली, ज्या आता सेंटर-राइट फोर्जा इटालिया पक्षाची सिनेटर आहे. त्यांनी स्ट्रासबर्ग येथील युरोपियन संसदेत आपल्या मुलीला स्तनपान केले होते.


हेही वाचा : Jai Shree Ram : दिल्ली न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी; मुस्लीम समुदायाने जय श्रीराम म्हणणे…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -