घरदेश-विदेशऐकावं ते नवलच! 27 राज्ये आणि 14 देशांचा जावई, 'या' व्यक्तीने 32...

ऐकावं ते नवलच! 27 राज्ये आणि 14 देशांचा जावई, ‘या’ व्यक्तीने 32 वर्षांत केली 100 लग्नं

Subscribe

100 हून अधिक महिलांशी लग्न केले. हे विवाह 1949 ते 1981 दरम्यान झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटस्फोटाशिवाय हे विवाह केले गेले. यामुळे या व्यक्तीने जगातील सर्वात जास्त  विवाह करण्याचा मान मिळवला आहे.

जगभरात अनेक प्रकारचे रेकॉर्ड (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) केले गेले आहेत आणि हे रेका‌र्ड्स भविष्यातही सुरू राहणार आहेत. आजही अनेकजण यासाठी प्रयत्न करत आहेत. काहींनी सर्वात लांब नख ठेवण्याचा विक्रम केला आहे.  तर काहींनी सर्वात लांब दाढीचा विक्रम केला आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्या व्यक्तीने सर्वाधिक विवाह करण्याचा विक्रम केला आहे. Giovanni Viglioto married 104 105 women between 1949 and 1981

या व्यक्तीने 100 हून अधिक महिलांशी लग्न केले. हे विवाह 1949 ते 1981 दरम्यान झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटस्फोटाशिवाय हे विवाह केले गेले. यामुळे या व्यक्तीने जगातील सर्वात जास्त  विवाह करण्याचा मान मिळवला आहे.

- Advertisement -

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ट्विटरवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिओव्हानी विग्लिओटोची कथा सांगणयात आली आहे. असे म्हटले जाते की, या व्यक्तीचे खरे नाव जिओव्हानी विग्लिओटो नव्हते, परंतु या व्यक्तीने आपल्या शेवटच्या पत्नीशी लग्न करताना हेच नाव वापरले होते.

वयाच्या ५३ व्या वर्षी जिओव्हानी विग्लिओटो  पकडला गेला. त्यानंतर असे समोर आले की, या व्यक्तीचा जन्म 3 एप्रिल 1929 रोजी इटलीतील सिसिली येथे झाला होता. त्याने आपले खरे नाव निकोलाई पेरुस्कोव्ह सांगितले. तथापि, नंतर एका फिर्यादीने सांगितले की त्याचे खरे नाव फ्रेड झिप आहे आणि त्याचा जन्म 3 एप्रिल 1936 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता.

- Advertisement -

विग्लिओटोने 1949 ते 1981 दरम्यान 104-105 महिलांशी लग्न केले. त्याच्या पत्नींपैकी कोणीही एकमेकांना ओळखत नाहीत. त्याच्या पत्नीनांही विग्लिओटोबद्दल फार कमी माहिती होती. असं सांगितलं जात आहे की,  त्याने ही लग्ने अमेरिकेच्या 27 राज्यांमध्ये आणि इतर 14 देशांमध्ये केली. प्रत्येक वेळी तो बनावट ओळखीने लग्न करत होता.

ज्या महिलांशी त्याने लग्न केले. त्या सर्व महिलांना तो चोरबाजारात भेटायचा आणि पहिल्याच भेटीत प्रपोज करायचा. लग्न झाल्यानंतर तो पत्नीचे पैसे व इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून जायचा. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार, तो महिलांना सांगत असे की, मी खूप दूर राहतो आणि त्यामुळे तुमचे सर्व सामान घेऊन माझ्याकडे या. जेव्हा स्त्रिया  सर्व सामान घेऊन त्याच्याजवळ येत तेव्हा विग्लिओटो त्या महिलेचे सामान ट्रकमध्ये भरुन पळून  जायचा. त्यानंतर तो  पुन्हा कधीच  दिसायचा नाही. चोरुन आणलेला सर्व माल तो चोर बाजारात विकायचा आणि त्यानंतर तो तिथेच इतर महिलांनादेखील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा.

( हेही वाचा: सट्टेबाजी आणि ऑनलाइन पैसे लावण्याच्या गेमवर बंदी; सरकारकडून नवीन नियम जाहीर )

विग्लिओटो  कसा आणि कुठे पकडला गेला?

विग्लिओटो विरुद्ध अनेक तक्रारी असूनही तो पळून जाण्यात यशस्वी होत होता. मात्र, त्याने ज्या  शेवटच्या महिलेशी लग्न केले त्या महिलेने त्याला अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये पकडले. शेरॉन क्लार्क असे या महिलेचे नाव असून ती इंडियानाच्या चोर मार्केटमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती.

येथे अधिकाऱ्यांनी 28 डिसेंबर 1981 रोजी विग्लिओटोला पकडले. त्यानंतर जानेवारी 1983 मध्ये त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला. त्याला एकूण 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षे तर एकापेक्षा जास्त विवाह केल्याप्रकरणी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यासोबतच त्याला $336,000 चा दंड ठोठावण्यात आला आहे.

त्याने आपल्या आयुष्यातील शेवटची 8 वर्षे ऍरिझोना राज्य कारागृहात घालवली. 1991 मध्ये वयाच्या 61 व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे त्याचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -