घरताज्या घडामोडीJodhpur Violence : सण कोणाचाही असला तरी हिंदुंवर हल्ल्याची प्रथाच झाली, गिरीराज...

Jodhpur Violence : सण कोणाचाही असला तरी हिंदुंवर हल्ल्याची प्रथाच झाली, गिरीराज सिंह संतापले

Subscribe

जोधपूर हिंसाचारावरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सण हिंदूंचा असो वा त्यांचा, हिंदूंवर दगडफेक करणे ही प्रथाच बनली आहे. राजस्थानमध्ये सरकारकडूनच दगडफेक केली जात आहे. यूपी आणि मध्यप्रदेशात हीच घटना घडली असती तर आतापर्यंत उपचार झाले असते अशा शब्दामध्ये गिरीराज सिंह यांनी संताप व्यक्त केला आहे.

गिरीराज सिंह यांनी घटनेचा व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे की, “सण हिंदूंचा असो किंवा त्यांचा हिंदूंवर दगडांनी हल्ला करण्याची प्रथा बनली आहे. सरकार राजस्थानसारखे धर्मनिरपेक्ष असेल तर त्यांची कामगिरी उजळते. हीच घटना यूपी किंवा मध्य प्रदेशात घडली असती तर आतापर्यंत उपचार झाले असते, पण इथे राजस्थान सरकारकडूनच दगडफेक होत आहे, असा हल्लाबोल गिरीराज सिंह यांनी केला आहे.

- Advertisement -

जोधपूरमध्ये गेल्या १४ तासांत हिंसाचाराच्या ४ घटना घडल्या आहेत. सोमवारी मध्यरात्रीनंतर अल्पसंख्याक समाजातील काही लोक ईदनिमित्त जालोरी गेटजवळील चौकात धार्मिक झेंडे लावत असताना हाणामारी सुरू झाली. चौकाच्या मध्यभागी असलेल्या स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर धार्मिक ध्वज लावण्यास हिंदू समाजाच्या लोकांनी विरोध केला.

भगवान परशुरामांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या भगव्या ध्वजाच्या जागी इस्लामी ध्वज लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले आणि हाणामारी सुरू झाली. दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले. जमावाला हटवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. अफवांमुळे वातावरण बिघडू नये म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. जोधपूर हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे मूळ गाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

तीन जण ताब्यात

दंगलीच्या घटनेत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यानंतर काल रात्री १२ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे, त्यामध्ये जोधपूरच्या १० पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. उदय मंदिर, सदर कोतवाली, सदर बाजार, नागोरी गेट, खांडाफळसा, प्रतापनगर आणि देवनगर हे क्षेत्र आहेत.


हेही वाचा : नेपाळच्या क्लबमध्ये राहुल गांधींची पार्टी, भाजपने व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -