घरताज्या घडामोडीप्रियकराबरोबर पळून गेलेल्या मुलीवर, दोन मित्रांनी केला बलात्कार!

प्रियकराबरोबर पळून गेलेल्या मुलीवर, दोन मित्रांनी केला बलात्कार!

Subscribe

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षांची मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. त्यानंतर नवी मुंबईतील खारघर येथील फ्लॅटमध्ये तिला अंमली पदार्थ देऊन बॉयफ्रेंडच्या दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यादनिका फाउंडेशनच्या अनिता कारंडे म्हणाल्या की, ‘तिने माझीशी काही दिवस बोलली आणि त्यानंतर तिने १५ ऑगस्ट रोजी या घडलेल्या घटनेची माहिती दिली.’

- Advertisement -

प्रत्यदर्शी व्यक्ती इमरान खान म्हणाला की, ‘दारवेज तिला खारघर येथे घेऊन आला. मग त्याने तिला थोडीशी पावडर (अंमली पदार्थ) खायला दिली. ज्यामुळे ती कमकुवत आणि दुर्बल बनली होती. मग त्यानंतर दारवेजचे दोन मित्र तिथे आले. त्यातील एकाने मुलीवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तर दुसऱ्याने तिच्यावर विनयभंग केला. जेव्हा त्यांना इमारतीच्या सीसीटीव्हीत ते कैद झाल्याचे समजले तेव्हा ते घाबरून पळून गेले.’

दरम्यान दारवेज या वाईट कृत्यात सामिल आहे कारण त्याने या दोघांना हे कृत्य करण्यास थांबवले नाही, असा आरोप पीडित मुलीने लावला आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील तिन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पत्नीचे सहा तुकडे करुन मृतदेह लपवला; क्षुल्लक चुकीमुळे आरोपी पती पोलिसांच्या जाळ्यात फसला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -