घरट्रेंडिंगVideo : पांडाच्या तावडीतून बचावली चिमुरडी

Video : पांडाच्या तावडीतून बचावली चिमुरडी

Subscribe

केवळ एका काठीच्या साहाय्यानेा त्या मुलीला कुंपणातून सुरक्षित बाहेर काढले. बचाव कार्याचा सगळा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.

गुबगुबीत आणि लोभसवाणा ‘पांडा’ सहास कुणालाही आपल्याकडे आकर्षित करुन घेतो. मात्र, हा पांडा वरवर जितका क्यूट दिसतो तितकाच तो क्रूरही असतो. पांडाने चिडून जर एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला तर त्यामध्ये एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. दरम्यान, काही पांडांच्या तावडीत आठ वर्षांची एक लहान मुलगी सापडली असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आठ वर्षांची ही चिमुरडी पांडासाठी बांधण्यात आलेल्या कुंपणात पडली. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंपणाची भिंत उंच बांधण्यात आल्यामुळे या मुलीला बाहेर पडणं शक्य होत नव्हते. दरम्यान, पांडा त्या मुलीला जखमी करतील या भीतीने लोकांनी आरडओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्या मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. काहीवेळाने त्यांनी एका काठीच्या साहाय्याने मुलीला कुंपणातून सुरक्षित बाहेर काढले. बचाव कार्याचा हा सगळा थरार या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.

- Advertisement -

ही घटना चीनमधील एका प्राणी संग्रहालयात घडली आहे. खेळण्याच्या नादात ती मुलगी पांडासाठी बांधण्यात आलेल्या कुंपणात पडली. सहसा कुंपणात कुणी अज्ञात माणूस किंवा प्राणी शिरल्यास पांडा त्यांच्यावर हल्ला करतात. आजवर जगभरातील अनेक संग्रहालयात अशा घटना घडल्या आहेत. दरम्यान, पांडाने त्या मुलीला कोणत्याही प्रकारची इजा करु नये यासाठी तिच्या कुटुंबियांनी आणि तिथल्या अन्य लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. संग्रहालयाच्या सुरक्षारक्षकांनी शर्थीचे प्रयत्न करत त्या मुलीला सुखरुप बाहेर काढले.

प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या पिंजऱ्यात किंवा कुंपण्यात माणसं पडण्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. यामध्ये काही लोक सुखरुप वाचले आहेत तर काहीजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -