गर्भपात न करता तरुणीला मिळाला न्याय आणि बाळाला मिळाले पालक

अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणीला गर्भपात करायचा होता. त्यामुळे तिने न्यायालयाचे दार ठोठावले. पण गर्भधारणेचे २९ आठवडे झाले होते. अशा परिस्थितीत गर्भपाताला परवानगी दिल्यास धोका होऊ शकतो. तर दुसरीकडे ती तरुणी जन्माला येणाऱ्या बाळाचे संगोपन करण्यास सक्षम नव्हती. त्यामुळे नेमके काय करावे असा यक्ष प्रश्न न्यायालयासमोर होता.

गर्भवती महिला

 

नवी दिल्लीः बदलत्या लाईफ स्टाईलमध्ये गर्भधारणा नको म्हणून अनेक जोडपी नियोजन करतात. तर अनपेक्षित गर्भधारणा किंवा व्यंग असलेले बाळ नको म्हणून अधिकृत गर्भपाताची परवानगी न्यायालयाकडे मागितली जाते. कायद्याच्या चौकटीत असलेल्या गर्भपातास न्यायालयाकडून परवानगी दिली जाते. मात्र एक गर्भपात रोखण्यात न्यायालयाला यश आले आहे. विशेष म्हणजे हा गर्भपात रोखताना जन्माला येणाऱ्या बाळासाठी आईवडीलही आधीच शोधले गेले आहेत.

अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणीला गर्भपात करायचा होता. त्यामुळे तिने न्यायालयाचे दार ठोठावले. पण गर्भधारणेचे २९ आठवडे झाले होते. अशा परिस्थितीत गर्भपाताला परवानगी दिल्यास धोका होऊ शकतो. तर दुसरीकडे ती तरुणी जन्माला येणाऱ्या बाळाचे संगोपन करण्यास सक्षम नव्हती. त्यामुळे नेमके काय करावे असा यक्ष प्रश्न न्यायालयासमोर होता.

गर्भपात न करता हे बाळ जन्माला येऊ दिल्यास त्याचे संगोपन कोण करणार असाही मुद्दा होता. त्या तरुणीच्या बहिणीचा नुकताच विवाह झाला होता. त्यामुळे तिला हे बाळ दत्तक द्यावे का?, असाही विचार करण्यात आला. मात्र अविवाहित बहिणीने जन्म दिलेले बाळ दत्तक घेतल्यास समाज काय म्हणेल, असा प्रश्न उभा राहिला. अखेर आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने या बळाचे संगोपन करण्यासाठी आई बाबा शोधले. तशी माहिती न्यायालयाल देण्यात आली. तरीही त्या तरुणीला गर्भपात करु नकोस असे सांगणे कठीण होते. अखेर महिला वकीलाने तिचे मन वळवले. त्यामुळे त्या तरुणीने गर्भपातासाठी नकार दिला.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठाने तत्काळ ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स्)  रुग्णालयाला तरुणीच्या प्रसुतीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. या तरुणीची मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसूती होणार आहे. ही प्रसूती विनामूल्य करावी, असे आदेश न्यायालयाने एम्स् रुग्णालयाला दिले.

याप्रकरणात Additional Solicitor General ऐश्वर्या भाटी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही तरुणी गर्भधारणेमुळे घाबरली होती. तिची समजूत काढणे कठीण होते. मात्र Additional Solicitor General भाटी त्या तरुणीशी रोज संवाद साधायच्या. तरुणी अभियांत्रिकीची विद्यार्थीनी होती. गर्भधारणेविषयी घराच्यांना किंवा मित्रांना सांगणे कठीण होते. अशा परिस्थितीत तिचे मन वळवणे कठीण होते. तरीही आवश्यक ती मदत करण्याची हमी तरुणीला देण्यात आली. त्यामुळे ती तरुणी प्रसुतीसाठी तयार झाली असल्याचे Additional Solicitor General भाटी यांनी न्यायालयाला सांगितले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बाळाचे संगोपन करण्यासाठी पालक शोधले आहे. हे जोडपे बाळ दत्तक घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रक्रियेला वेळ लागतो. त्या जोडप्याचे नाव प्रतिक्षा यादीत होते. हे जोडपे या बाळाला दत्तक घेण्यासाठी तयार झाले आहेत, अशी माहिती सॉलिसिटर जनरल मेहता यांनी न्यायालयाला दिली.

न्यायालयही होते चिंतेत

तरुणी प्रसूतीसाठी तयार झाली हे ऐकून सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी Additional Solicitor General भाटी यांचे आभार मानले. हा अत्यंय नाजूक विषय होता. तरुणी २९ आठवड्यांची गरोदर होती. अशा परिस्थितीत गर्भपात अशक्य होता. तरुणी बाळाचे संगोपन करण्यास तयार नव्हती. त्यामुळे यातून काय मार्ग काढाव या चिंतेत आम्ही होतो. पण या गंभीर परिस्थितीवर Additional Solicitor General भाटी यांनी मार्ग काढला, असे मत सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी व्यक्त केले.