खळबळजनक! महसूल अधिकाऱ्याने केला तरुणीवर बलात्कार

एका १८ वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर महसूल अधिकाऱ्यासह दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

girl raped;
अत्याचार

एका १८ वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर महसूल अधिकाऱ्यासह दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी या जिल्ह्यात तैनात असलेल्या सुशील पटेल या लेखपालाविरोधात अपहरणानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात तैनात असलेल्या लेखपालाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोतवाली येथे पीडित मुलीने सोमवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार प्रभारी पोलीस निरीक्षक गिरिंद्र सिंह यांनी सांगितले की, शनिवारी, ६ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १८ वर्षीय मुलीसोबत ही घटना घडली होती. परंतु, दोन दिवसांनी सोमवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी मुलगी आपल्या दारात कचरा साफ करत होती. दरम्यान, पुखरी गावात तैनात लेखपाल (महसूल कामगार) सुशील पटेल आणि दोन साथीदारांसह जीपमधून आला आणि मुलीला जबरदस्तीने जीपमध्ये टाकले आणि घेऊन गेले. मुलीच्या आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिला ढकलून देऊन तिथून पळ काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – Corona: भारतात तयार होणार कोरोनाची लस; पुण्यातील कंपनीशी केला करार