घरदेश-विदेशप्रेमामध्ये धोका; पैशांसाठी प्रियकराचे अपहरण!

प्रेमामध्ये धोका; पैशांसाठी प्रियकराचे अपहरण!

Subscribe

पैशांसाठी एका महिलेने आपल्या प्रियकराचे अपहरण केले आहे. या महिलेला आणि तिला साथ देणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी अपहरण करुण ४० हजार रुपये बळकावले होते.

सध्या प्रेमाची व्याख्याच बदलताना दिसत आहे. फक्त पैशांचे स्वार्थ आणि आकर्षणासाठी प्रेम केले जात आहे. यासंबंधीच एक ताजी घटना चैन्नईच्या वादापालानी येथे घडली आहे. पैशांसाठी या महिलेने प्रियकराचे अपहरण घडवून आणले आहे. ही महिला विवाहित होती. विवाहित असूनही तिचे अभिजीत दास या व्यक्तिसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊनच या महिलेने दास यांच्या अपहरणाचा कट रचला. त्यांच्याकडून पैसे उकळले. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे आणि सहा जणांना अटक केली आहे. थिरुलोरचंद, राजेश कुमार दास, बिट्टू कुमार, जलालुद्दीन, राजेंद्रन, सर्वानन आणि जोश्ना असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

हेही वाचा – धक्कादायक: अनैतिक संबंधातून आईनेच काढला मुलाचा काटा

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

अपहरण करण्यात आलेले गृहस्थ अभिजीत दास यांचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. या महिलेचे नाव जोश्ना असे आहे. अभिजीत दास हे बहुजमली इमारती उभ्या करणाऱ्या एका बांधकाम कंपनीत नोकरीला आहेत. ते या कंपनीत सुपरवायझर आहेत. ते दर आठवड्याला कामगारांना पगार देतात. त्यामुळे त्यांच्या हातात पैसे नेहमी फिरत असतात. ही बाब जोश्नाला माहित होती. जोश्नाने बऱ्याचदा दास यांच्याजवळ पैसे बघितले होते. प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन जोश्नाने दास यांच्या अपहरणाचा कट रचला. सोमवारी संध्याकाळी दास हे साईटवर आले. ते जोश्नाच्या रुमवर गेले. त्यावेळी सहा जण रुमवर आले. त्यातील जोश्ना ही माझी पत्नी असल्याचे सांगितले. त्याने दास यांना धमकावले आणि शिवीगाळ केली. त्यांच्याजवळ असलेले ४० हजार रुपये बळकावले आणि त्या सहाही जणांनी दास यांना रिक्षामध्ये कोंबले आणि निघून गेले. हा सर्व गोंधळ तेथील साईटवरच्या कामगारांच्या समोर घडला. कामगारांनी परिसरातील पोलीस स्थानकात धाव घेत या घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मंगळवारी सकाळी दास यांची सुटका केली आणि सहाही आरोपींना शोधून काढले. सध्या या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा – प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -