घरदेश-विदेशआश्रमात मुलींच्या गुप्तांगात टाकली जात होती मिर्ची पुड

आश्रमात मुलींच्या गुप्तांगात टाकली जात होती मिर्ची पुड

Subscribe

दिल्लीतील एका मुलींच्या आश्रमात मुलींनी शिक्षा म्हणून त्यांच्या गुप्तांगामध्ये मिर्ची पावडर टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका एनजीओ विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिल्ली येथील महिला आयोगाने एका महिला आश्रमात टाकलेल्या धाडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आश्रमात महिलावर लैगिंक अत्याचार करुन छळ केले जात होते. या आश्रमातील मुलींनी जर सांगितलेली काम नाही केली तर त्यांच्या गुप्तांगात मिर्ची पुड टाकण्यात येत असल्याची माहिती महिला आयोगाने दिली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. हे आश्रम एका संस्थेद्वारे चालवले जात होते. या आश्रमातील कर्मचारी येथील मुलींबरोबर अमाणूष वागणूक करत असल्याचा आरोप महिला आयोगाने लावला आहे. या प्रकरणी पाक्सो कायद्याअंतरर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या आश्रमात ६ ते १५ वर्षीय मुली राहात होत्या. दरम्यान या मुलींची सुटका करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

धाडीत उघडकीस आला प्रकार

महिला आयोगाच्या एक तज्ञ समितीद्वारे शहरातील एनजीओद्वारे सुरु असेलल्या आश्रमावर धाड टाकण्यात येते. आश्रमात कोणताही गैरव्यवहार होऊ नये म्हणून या धाडी टाकल्या जातात. धाड टाकलेल्या आश्रमातील मुलींना चांगले अन्न मिळत नसल्याची तक्रार समितीकडे आली होती. त्यामुले तपास करण्यासाठी ही धाड टाकण्यात आली होती.

- Advertisement -

“धाडीदरम्यान येथील काही मुली घाबरलेल्या असल्याचे आढळून आले. या मुलींना विश्वासात घेऊन त्यांना विचारण्यात  आले. आश्रमातील अनेक कामे या लहान मुलींना दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र कोणी काम न ऐकल्यास त्यांच्या गुप्तांगामध्ये मिर्ची पुड टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.” – तज्ञ समिती अधिकारी

मीळालेल्या तक्रारीवरून तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून या अधिकाऱ्यांविरोधात पुराव्यांचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -