बांगलादेश : बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचे पडसाद जगभर उमटू लागले आहेत. अशात आता बांगलादेशी हिंदूंसाठी वेगळ्या स्वतंत्र देशाची मागणी होत आहे. बांगलादेशी वंशाच्या ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या नेत्या पुष्पिता गुप्ता यांनी ही मागणी केली आहे. ‘बांगलादेशात स्वातंत्र्यानंतर हिंदूंवर हल्ले होत आहेत, त्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे’, असं म्हणत ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या नेत्या पुष्पिता गुप्ता यांनी वेगळ्या देशाची मागणी केली आहे. (Give an independent country to Bangladesh Hindus Voice raised from Britain)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुष्पिता सांगितले की, “बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यापासून हिंदूंवर हल्ले वाढले आहेत. नोबेल पारितोषिक विजेते युनूस हे हल्ले रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आज तेथील हिंदूंची अवस्था सर्वात वाईट आहे. बांगलादेशातील 8 टक्के लोकसंख्या हिंदू आहेत, ते सर्व मोदींचे कुटुंब आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा”, असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय, “माझे संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये राहत असून मी इथे काम करतो. माझी मातृभूमी बांगलादेशाशी मी जोडला गेलो आहे. मी जवळजवळ दरवर्षी बांगलादेशात जातो. शेख हसीना यांच्या काळात बांगलादेश आर्थिकदृष्ट्या प्रगती करत होता. तसेच, हिंदूंची स्थितीही चांगली होती. पण सत्तापालटानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज मी आणि माझ्यासारखे अनेक लोक बांगलादेशात जाऊ शकत नाही. गेलो तरी तिथे सुरक्षित फिरू शकत नाही. आज बांगलादेश भारत सरकारकडे शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. पण शेख हसीना यांच्या सुरक्षेच्या कारणात्सव भारत आमची ही मागणी मान्य करू शकत नाही”, असे पुष्पिता गुप्ता यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, “बांगलादेशातील हिंदूंची स्थिती पहिल्यापासूनच चांगली नाही. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत तिथे राहत होतो तेव्हा माझी आई तिथे मंदिरात पूजा करायला जात असे. पण तिथल्या अनेक कट्टरतावादी लोकांना ही गोष्ट आवडली नाही. एके दिवशी एका इसमाने त्या मंदिरात गोमांस फेकले आणि त्याचे तुकडे केले. त्या दिवसानंतर बांगलादेश आमच्या कुटुंबासाठी कधीही सुरक्षित राहिला नाही. माझ्या आईने मला माझ्या बहिणींसोबत बांगलादेशातून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली. आम्ही बाहेर आलो, पण माझ्या आईला इतका धक्का बसला की त्यानंतर ती फार काळ जगली नाही. या सर्व परिस्थिती असतानाही शेख हसीना सत्तेवर आल्यावर त्यांनी हिंदूंच्या रक्षणाचे काम केले. पण आज पुन्हा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे जगभरातील नेत्यांना आवाहन आहे की, आता वेळ आली आहे की बांगलादेशी हिंदूंसाठी वेगळा देश निर्माण केला पाहिजे”, असेही पुष्पिता गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा – Gurmeet Ram Rahim : राम रहीमला न्यायालयाची नोटीस; HCच्या निकालाला CBIचं SCमध्ये आव्हान