घरदेश-विदेशवैज्ञानिकांच्या मते कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तिसरी लाट जाहीर करण्यात घाई...

वैज्ञानिकांच्या मते कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तिसरी लाट जाहीर करण्यात घाई करु नये

Subscribe

कोरोना व्हायरसचा प्रभाव काही राज्यात अजून कायम आहे. पण वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या लाटेची सुरूवात झाली आहे हे जाहीर करण्यास घाई करु नये. तसेच वैज्ञानिकांच्या मते तिसऱ्या लाटेपासून घाबरण्याची काही गरज नाही.नागरिकांनी कोरोना लसीकरणावर जोर द्यावा. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावावर तसेच काही ठीकाणी वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्या रेंखाकित करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते असे देखील होऊ शकते की भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरली नसेल. हरियाणा स्थित अशोक विश्वविद्यालयमधील भौतिक शास्त्र आणि जीविज्ञान विभागातील प्रोफेसर गौतम मेनन यांच्या नुसार, उदाहरणार्थ भारतातील ईशान्येकडील राज्यांची प्रकरणे दिल्ली आणि इतर उत्तरेकडील राज्यामध्ये पाहिल्याप्रमाणे सर्वात कमी पातळीवर गेली नाहीत. अशा प्रकारे, हे शक्य आहे की आम्ही नवीन कोव्हिड- 19 लाटेच्या प्रारंभाऐवजी दुसऱ्या लाटेकडे लक्ष केंद्रीत करत आहोत. चेन्नई स्थित इंस्टीट्यूट ऑफ मॅथमेटिकल साइसेंजच्या संशोधनकर्त्यांनी केलेल्या नवीन संशोधनानुसार 7 मे नंतर प्रथमच भारतात आर फॅक्टर म्हणजेच ‘आर’ क्रमांकाने(संक्रमित व्यक्तीमुळे इतर लोकांना संक्रमित होण्याची शक्यता आहे)एकाने पार केल आहे.कोरोनाची तिसरी लाट जाहीर करणे खूप लवकर आहे, असे मत वैज्ञानिकांनी मांडले

संशोधनकर्ता सीताभ्र सिन्हा यांच्या मते ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे की आर संख्या कोणत्याही क्षेत्रात वाढता कामा नये. अनेक राज्यात आर फॅक्टर एकापेक्षा अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. केरळमध्ये एका महिन्यापासून आर फॅक्टर एकापेक्षा जास्त आहे. तसेस पूर्वोत्तर राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही ओसरला नाहीये. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून याचा प्रभाव वाढत आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात कर्नाटक,हिमाचल प्रदेश आणि हरियाणा,उत्तराखंड राज्यात आर फॅक्टर आकडा पार झाला आहे. तर चैनई,कोलकाता,बंगळूर,दिल्लीमध्ये देखील हिच परिस्थिती कायम राहीली तर संबधित राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -