घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटआत्मसंतुष्ट होणं धोक्याचं, जागतिक स्तरावर परिस्थिती बिघडतेय - WHO

आत्मसंतुष्ट होणं धोक्याचं, जागतिक स्तरावर परिस्थिती बिघडतेय – WHO

Subscribe

ज्या देशांमध्ये परिस्थिती सुधारत आहे तिथे आत्मसंतुष्ट होणं हा सर्वात मोठा धोका आहे.

देशाची आर्थिक स्थिती घडी बसवण्यासाठी देशातील लॉकडाऊन शिथिल केलं असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी इशारा दिला होता, असं WHO ने म्हटलं आहे. सोमवारी सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम म्हणाले की जागतिक स्तरावर परिस्थिती बिघडत चालली आहे. यामुळे जगभरात असंतोष निर्माण होऊ शकतो, असं WHO ने म्हटलं आहे. युरोपमधील परिस्थिती सुधारत आहे, परंतु जागतिक पातळीवर परिस्थिती बिघडत आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनेवा येथील व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

हेही वाचा – १० जूनपासून नवीन नियम लागू, एसबीआय ग्राहकांना लाभ मिळणार


गेल्या २४ तासांत १ लाख ३६ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. जे एका दिवसातले सर्वात जास्त रुग्ण आहे. यातील बहुतेक प्रकरणे अमेरिका आणि दक्षिण आशियातील आहेत. ज्या देशांमध्ये परिस्थिती सुधारत आहे तिथे आत्मसंतुष्ट होणं हा सर्वात मोठा धोका आहे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. महामारीला जवळपास सहा महिने झाले आहेत. कोणत्याही देशाने लगेच यामधून बाहेर पडणं योग्य नाही, असं टेड्रोस यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -