घरअर्थजगतजागतिक चलनवाढ घसरणार, महागाईमुळे अर्थव्यवस्था ढासळली; IMF चा अंदाज

जागतिक चलनवाढ घसरणार, महागाईमुळे अर्थव्यवस्था ढासळली; IMF चा अंदाज

Subscribe

यंदाच्या आर्थिक वर्षात जागतिक चलनवाढ कमी होणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) वर्तवला आहे. मूलभूत गरजाही महाग झाल्याने लोकांचं जगणं कठीण झालं आहे. त्यामुळे महागाई कमी करणे सर्व अर्थव्यवस्थांचे प्राधान्य आहे.

युद्ध आणि महागाईविरोधात लढण्याकरता मध्यवर्ती बँकांनी करांमध्ये वाढ केली आहे. परिणामी अनेक देशांतील अर्थव्यवस्था मंदावली आहे. चीनमध्ये लॉकडाऊन लागल्यानेही जगाची आर्थिक घडी विस्कटली होती. परंतु, आता तेथील लॉकडाऊन उठल्याने जागतिक विकासाला मदत होण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि कोरोनामुळे लॉजिस्टिक आव्हान निर्माण झाले आहेत. त्यामुळे आयात-निर्यात थंडावली आहे.

- Advertisement -

जागतिक आर्थिक वाढ 2022 मध्ये 3.4 टक्के होती. ही वाढ आता घसरून 2.9 टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर, हाच दर 2024 मध्ये 3.1 टक्क्यांपर्यंत येण्याचा अंदाज आहे. 2023 चा सध्याचा अंदाज ऑक्टोबर 2022 वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या अंदाजापेक्षा 0.2 टक्के जास्त आहे. दरम्यान, 2000 ते 2019 मधील वाढ 3.8 टक्क्यांच्या खाली राहिली आहे.

IMF ने काही देश आणि प्रदेशांसाठी स्वतंत्र वाढीचे अंदाज जारी केले आहेत. 2022 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये 2.0 टक्के वाढ झाली होती. 2023 मध्ये हाच दर 1.4 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, चीनचा विकास 2022 मधील 3.0 टक्क्यांवरून यावर्षी 5.2 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तर 2024 मध्ये ते 4.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

भारताचा विकास दर किती असेल?

या अहवालातील आकडेवारीनुसार, या वर्षी भारताचा विकास दर 6.8 टक्क्यांवरून 6.1 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. तर, 2024 मध्ये हा दर 6.8 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. रशियाने 2022 मध्ये 2.2 टक्केची अंदाजे नकारात्मक वाढ नोंदवली आहे. IMF च्या अंदाजानुसार, 2022 मध्ये युरो क्षेत्राची एकत्रित वाढ 3.5 टक्के होती. 2022 मध्ये युनायटेड किंगडमचा विकास दर 4.1 टक्क्यांपर्यंत वाढला होता.

महागाईपासून मुक्ती मिळेल का?

IMF च्या मते, 2022 मध्ये महागाई 8.8 टक्क्यांवर पोहोचेल. 2023 मध्ये ते 6.6 टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे आणि 2024 मध्ये आणखी घसरून 4.3 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तरीही महागाईचा अंदाज हा लॉकडाऊनपूर्व पातळीपेक्षा जास्त आहे. 2017 आणि 2019 दरम्यान महागाई सरासरी 3.5 टक्के होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -