घरदेश-विदेशधक्कादायक! जगभरात ३ पैकी १ मृत्यूसाठी ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार- संशोधन

धक्कादायक! जगभरात ३ पैकी १ मृत्यूसाठी ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार- संशोधन

Subscribe

जगात औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले. परंतु याला संपूर्णपणे मानवी प्रक्रिया जबाबदार आहे. हवामान बदल आणि मानवी प्रक्रिया यांसंबंधीत नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळले की, दरवर्षी जगातील वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हे थेट ग्लोबल वार्मिंगमुळे होत आहेत.

परंतु यावर शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हवामान बदलामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण केवळ १ टक्के आहे. तर वादळ, पूर, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्ती यांसारख्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्वाधिक लोक मरतं आहेत. यात वाढत्या तापमानासह वाढणाऱ्या उष्णतेमुळे मृत्यांची संख्या वाढत आहे.नेचर क्लायमेट चेंज या जर्नलच्या अभ्यासानुसार, डझनभर संशोधकांनी १९९१ ते २०१८ या कालावधीत जगभरातील ७३२ शहारांमधील उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूचे संशोधन केले यात ३७ टक्के उच्च तापमानवाढीस मानव कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या संशोधनातील ७३२ शहरांमधील मृत्यूचे प्रमाण वर्षाकाठी ९,७०० इतके आहे. परंतु जगभरात हे प्रमाण सर्वाधित असल्याचे संशोधनात समोर आले आहे. तसेच उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूस प्रत्यक्षात रोखता येऊ शकते. या उष्णतावाढीस आपण स्वत: कारणीभूत ठरत आहोत. असे स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठातील सामाजिक आणि प्रतिबंधक संस्थेच्या महामारी वैज्ञानिक एना वाइसेडो-कॅब्रेरा यांनी सांगितले. हवामान बदलामुळे होणार्‍या तीव्र उष्णतेमुळे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण दक्षिण अमेरिकेतील शहरांमध्ये होते.  दक्षिण युरोप आणि दक्षिण आशियात हवामान बदलाशी संबंधित उष्णतेमुळे होणार्‍या मृत्यूवर वाइसेडो-कॅब्रेरा यांनी लक्ष केंद्रित केले.

ब्राझीलमधील साओ पाउलो शहरात सर्वात जास्त हवामान बदलामुळे वाढणाऱ्या उष्णतेमुळे मृत पावणाऱ्यांचे प्रमाण वर्षाकाठी सरासरी २९३ इतके आहे. असे संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकेत हवामान बदलामुळे वाढणाऱ्या उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे ३५ टक्के लोक मृत होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला असे या अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकेत जवळपास २०० शहरांमध्ये एका वर्षात सुमारे ११०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, हेच न्यूयॉर्कमधील प्रमाण १४१ हून अधिक आहे. हवामान बदलामुळे होनोलुलूमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा सर्वाधिक हिस्सा म्हणजे ८२ टक्के आहे.

- Advertisement -

तापमान वाढीमुळे प्रत्येक शहराचा मृत्यू दर कसा बदलतो आणि उष्णतेसह मृत्यूचे चक्र कसे एका शहरातून दुसर्‍या शहरात बदलते याविषयी आखणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ७३२ शहरांमधील दशकांचा मृत्यू डेटा वापरला. काही शहरे वातानुकूलन, सांस्कृतिक घटक आणि पर्यावरणीय परिस्थितीमुळे इतरांपेक्षा उष्णतेला अनुकूल बनवतात, असे वाइसेडो-कॅब्रेरा म्हणाले.

मग संशोधकांनी तापमान निरीक्षण केले आणि त्यांची तुलना 10 संगणक मॉडेल्सशी केली ज्यात हवामान बदल न करता जगाचे अनुकरण केले. यात मानवी प्रक्रियांमुळे तापमान वाढ होत आहे असे आढळले. ७३२ शहरांसाठी वैयक्तिकरित्या उष्णता आणि मृत्यूच्या वक्रांवर वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकारलेले तंत्र लागू करून, वैज्ञानिकांनी हवामानातील बदलांमुळे उष्णतेच्या अतिरिक्त मृत्यूची गणना केली.

हवामान बदलामुळे आधीच आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे याचा पुरावा लोकांकडून मागितला जात आहे. यावर विस्कॉन्सिन विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. जोनाथन पाट्ज म्हणाले की, हा गुणविशेष अभ्यास थेट त्या विज्ञानातील महामारीविषयक पद्धतींचा वापर करून त्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि लेखकांनी विश्लेषणासाठी किती डेटा गोळा केला हे प्रभावीरित्या सिद्ध करतो. अभ्यासाचा भाग नसलेले पाट्ज म्हणाले की, भविष्यात हवामान बदलाशी संबंधित उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूची माहिती देणारी ही पहिली एक संस्था आहे.


भारतात आढळणाऱ्या कोरोना व्हेरियंटचे WHO कडून नामकरण, ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ नावाने ओळखले जाणार हे व्हायरस


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -