घरदेश-विदेशदिलासादायक! देशात खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण; असे आहेत नवे दर

दिलासादायक! देशात खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण; असे आहेत नवे दर

Subscribe

भारताने २०२१-२२ या वर्षभरात १.५७ लाख कोट्यावधी रुपयांचे खाद्यतेलाची आयात केली आहे. यात भारताने इंडोनेशिया आणि मलेशिया या देशातून पामतेल खरेदी केले तर अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेलाची आयात केले जाते.

मुंबई | देशात सर्वसामान्य महागाईच्या झळा सोसत आहेत. यात आता महागाईतून सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.  मागील काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर खाद्यतेलच्या (Cooking Oil) किंमती घट होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने देशातील खाद्यतेल कंपन्यांना किंमतीत कपात करण्याचे निर्देश गुरुवारी दिले आहेत. यानुसार, देशातील खाद्यतेल कंपन्यांनी देखील तेलाच्या किंमतीत (MRP) ६ टक्केपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत हा खाद्यतेल आयात करणार देश आहे. भारताने २०२१-२२ या वर्षभरात १.५७ लाख कोट्यावधी रुपयांचे खाद्यतेलाची आयात केली आहे. यात भारताने इंडोनेशिया आणि मलेशिया या देशातून पामतेल खरेदी केले तर अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेलाची आयात केले जाते.

- Advertisement -

खाद्यतेल होणार स्वस्त

यामुळे धारा, जेमिनी आणि फॉर्च्युन हे देशातील नावाजलेले खाद्यतेल ब्रँडच्या किंमती प्रति लिटर मागे २० रुपयांपर्यंत कमी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. यात सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले की, येत्या तिमाहीत खाद्यतेलाच्या किंमती कमी होती.

- Advertisement -

हेही वाचा – गुड न्यूज! खाद्यतेल स्वस्त होणार! भावात इतकी झाली कपात

‘या’ ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किंमती किती कपात होणार 

गौतम अदानी समूहांची कंपनी अदानी विल्मर फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत विकत असलेले अंबाडी, मोहीर, सोया, तांदळाचा कोडा, शेंगदाणे आणि कापूस बियाणे तेल विकतात. या खाद्यतेलात प्रति लिटर मागे ५ रुपयांनी कपात होणार आहेत. तसेच फॅट्स इंडिया आणि जेमिनी एडिबल या खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति लिटर १० रुपयांनी किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या व्यतिरिक्त मदर डेअरी, धारा या बँडच्या खाद्यतेलाच्या किंमती देखील प्रति लिटर मागे १५ ते २० रुपयांनी कपात होणार आहे. यापूर्वीच मदर डेअरी त्यांच्या तेलाच्या किंमती कपात तेली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -