Facebook, Insta, WhatsAPP पाठोपाठ आता Gmail डाऊन, ट्विटरवर तक्रारींचा पूर

Facebook, Insta, WhatsAPP पाठोपाठ आता Gmail डाउन, ट्विटरवर तक्रारींचा पूर
Gmail suffers outage in India

काही दिवसांपूर्वी गुगलच्या लोकप्रिय Facebook, Insta, WhatsAPP सेवा तात्पुरत्या बंद झाल्या होत्या. पाठोपाठ आता Gmail सेवाही आज डाऊन झाल्याचे समोर आले आहे. अनेक जी-मेल युझर्सना कोणताही मेल येत नाही किंवा पाठवताही येत नाही. त्यामुळे ट्विटरवर आता जी-मेल डाऊनच्या तक्रारींचा पूर आला आहे. ट्विटरवर #GmailDown टॉप ट्रेंडवर आहे. यूजर्स या टॅगच्या माध्यमातून ट्विट करत आपली समस्या मांडत आहेत.

गुगलच्या माध्यमातून जी-मेल ही सेवा मोफत सेवा दिली जाते. मात्र भारतात आत्ता जी-मेल सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे वापरकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. काही वापरकर्त्यांना सर्व्हर कनेक्शन तर काहींना लॉ़गिन करताना अडचणी येत आहेत.

भारतातही काही यूजर्सला जी-मेल वापरताना अडचणी येत आहेत. डाउन डिटेक्टरनुसार, ६८ टक्के यूजर्सने वेबसाइट ओपन करताना अडचणी येत आहेत. १८ टक्के यूजर्सनी सर्व्हर कनेक्शन आणि १४ टक्क्यांनी लॉग इन समस्या येत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर २०२० रोजीही जी-मेल सेवा डाऊन झाली होती.

तर ४ ऑक्टोबरला प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, WhatsApp आणि Instagram जवळपास ६ तास ठप्प झाले होते. यावेळी या कोणत्याही अॅपमधून मेसेज जात नव्हते किंवा येत नव्हते. ६ तासांच्या डाऊननंतर पहाटे ३ च्या सुमारास Facebook, WhatsApp आणि Instagram पून्हा सुरु झाले.