घरताज्या घडामोडीपक्षी आदळल्याने अहमदाबादहून चंदीगडला जाणारे गो फर्स्ट विमान अचानक वळवले

पक्षी आदळल्याने अहमदाबादहून चंदीगडला जाणारे गो फर्स्ट विमान अचानक वळवले

Subscribe

गुजरातच्या अहमदाबादहून चंदीगडला जाणारे गो फर्स्ट विमान अचानक वळवण्यात आले. गो फर्स्ट फ्लाइट G8911 या विमानावर पक्षी आदळल्याने विमान अहमदाबादच्या दिशेने वळवण्यात आले.

गुजरातच्या अहमदाबादहून चंदीगडला जाणारे गो फर्स्ट विमान अचानक वळवण्यात आले. गो फर्स्ट फ्लाइट G8911 या विमानावर पक्षी आदळल्याने विमान अहमदाबादच्या दिशेने वळवण्यात आले. याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (डीजीसीए) माहिती दिली आहे. (go first ahmedabad chandigarh flight sent back to ahmedabad after hitting a bird)

गेल्या काही महिन्यांत काही विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा या गैरप्रकारांमुळे विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या घटनांबाबत कठोर भूमिका घेतली असून या विमान कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

- Advertisement -

याशिवाय, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने 2 ऑगस्ट रोजी स्पाईसजेटच्या 50 टक्के फ्लाइट्सवर 8 आठवड्यांसाठी बंदी घातली होती. स्पाइसजेट सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

डीजीसीएने सर्वप्रथम स्पाईसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावेळी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात उतरल्यानंतर कॉकपिटमधून धूर निघत असल्याची बातमीही समोर आली होती, त्यानंतर डीजीसीएने कंपनीला नोटीस पाठवून उत्तर मागितले होते.

- Advertisement -

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी एअरपोर्टच्या टी-२ टर्मिनल स्टॅण्ड नंबर २०१वर ही घटना घडली. गो फर्स्ट (Go First) कंपनीची ही कार असून ती इंडिगो एअरलाइनच्या A320neo विमानाखाली आली.

गो फर्स्ट कारच्या चालकाने मद्यपान केले आहे, याचीही पडताळणी घेण्यात आली. त्याची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट केली असता, त्याने मद्यपान केले नसल्याचे स्पष्ट झाले. तथापि, या घटनेत विमानाचे कोणतेही नुसकान झाले नाही, तसेच सुदैवाने या घटनेत जीवितहानी देखील झाली नव्हती.


हेही वाचा – बेस्टची ‘वॅले पार्किंगची सुविधा’; आता डेपोतही गाडी पार्क करता येणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -