लवकर घरी जा, मुलं जन्माला घाला, चीनमधील IT कंपन्याचा कर्मचाऱ्यांना आदेश

चीनचा राष्ट्रीय प्रजनन दर १.३ टक्के इतका कमी झाला आहे.

Go home early, give birth to children order from IT company in China
लवकर घरी जा, मुलं जन्माला घाला, चीनमधील IT कंपन्याचा कर्मचाऱ्यांना आदेश

जगभरात लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा पहिला क्रमांक लागतो. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता चीनने काही नियम लागू केले होते ज्यामुळे तिथली लोकसंख्या आटोक्यात आणण्यास मदत झाली होती. चीनमध्ये सर्वाधिक लोक हे म्हतारपणाकडे वळत आहे. त्यामुळे चीनने पुन्हा एकदा लोकसंख्या वाढवण्याचे आदेश दिलेत. चीनमध्ये सध्या अनेक ठिकाणी लोक आठवड्यातील ६ दिवस दिवसाचे १२-१२ तास काम करत आहेत. मात्रआता लोकसंख्या वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर घरी जा आणि मुल जन्माला घालण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश चीनमधील IT कंपन्याचा कर्मचाऱ्यांना दिले आहेत. (Go home early, give birth to children order from IT company in China)
आश्चर्य वाटावे असे चीन आदेश सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. कर्मचारी लवकर घरी जावेत यासाठी त्यांचा ओव्हर टाइम कमी करण्यात आलाय. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच काम करा असे सांगण्यात आले आहे.

एका चीनी वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार, चीनमधील तरुण लोकांवर कामाच्या ठिकाणी खूप प्रेशर आहे. ज्याचा त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर परिणाम होत आहे. चीनचा राष्ट्रीय प्रजनन दर १.३ टक्के इतका कमी झाला आहे. कर्मचाऱ्यांची कामासंबंधी एकमेकांशी सुरु असलेली स्पर्धा हे त्याचे मुख्य कारण आहे. कंपनीमधील ओव्हर टाईम बंद केल्याने चीनमधील तरुण जोडप्यांना आपला परिवार वाढवण्यासाठी वेळ मिळेल,असे त्यांनी म्हटले आहे.

चीनने दिलेले हे नवीन आदेश १ ऑगस्टपासून चीनमध्ये लागू होणार आहेत. चीनमधील लोकसंख्या वाढवण्यासाठी राष्ट्रीय उद्देश समोर ठेवून नागरिकांना यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चीनमध्ये या घोषणेनंतर काही वेळातच सोशल मीडियावर चर्चा होण्यास सुरुवात झालीय. कामगारांची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी आणि देशात घटत चाललेली लोकसंख्या वाढवण्यासाठी मदत करा, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केले आहे.


हेही वाचा – कोरोनाचा बोगस रिपोर्ट पडला महागात, डेहराडूनला येताच गेले आत