घरदेश-विदेशगोव्यात पक्षांतर नाट्य; महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपात विलीन

गोव्यात पक्षांतर नाट्य; महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपात विलीन

Subscribe

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मनोहर आजगावकर आणि दीपक पवास्कर या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिले.

गोव्यात पुन्हा पक्षांतराचे नाट्य सुरु झाले आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात फूट पडली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गोव्यात मध्यरात्री झालेल्या या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मनोहर आजगावकर आणि दीपक पवास्कर या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिले. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपात विलिनीकरण करत असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आमदार आहे. त्यापैकी दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्यातील ३६ आमदरांपैकी भाजपचे आता १४ आमदार झाले आहेत.

- Advertisement -

मध्यरात्री दोन आमदार भाजपात

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मनोहर आजगावकर आणि दीपक पवास्कर या आमदारांनी मंगळवारी मध्यरात्री १.४५ वाजता उपसभापती मायकल लोबो यांना भाजपमध्ये विलिनीकरण करत असल्याचे पत्र दिले आहे. दरम्यान, मागोपमधील तिसरे आमदार सुदिन धवालिकर यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली नाही. सुदिन धवालिकर भाजपच्या नेतृत्वात असलेल्या गोवा सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे आमदार भाजपात आल्याने गोव्यातील भाजपा सरकार आता स्थिर झाले आहे.

- Advertisement -

सुदिन धवालिकरांची खुर्ची अडचणीत

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मागोपचे आमदार दीपक पवास्कर यांनी दावा केला आहे की, त्यांना प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्रीपद दिले जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदिन धवालिकर यांना कॅबिनेटमधून बाहेर काढले जाऊ शकते.

भाजप-काँग्रेस आमदारांची संख्या सारखी

मध्यरात्री मगोपच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जे नाट्यमय राजकारण झाले. त्यामुळे ३६ सदस्य असलेल्या विधीमंडळात भाजप आमदारांची संख्या १२ वरुन आता १४ वर आली आहे. त्यामुळे आता भाजप आमदारांची संख्या काँग्रेस आमदारांऐवढीच झाली आहे मगोप २०१२ पासून भाजपचा मित्र पक्ष राहिला आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -