घरताज्या घडामोडीGoa Assembly elction : गोव्यात युती आघाडी नाही तर चांगलं प्रशासन देणार...

Goa Assembly elction : गोव्यात युती आघाडी नाही तर चांगलं प्रशासन देणार – संजय राऊत

Subscribe

निवडणुकीच्या पुर्वी काही नेते निर्लज्जासारखे पक्ष बदलत असतात. आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना आम्ही घेत नाही.

गोव्यात आता युती आघाडी नाही तर चांगलं प्रशासन देण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमची अशी भूमिका आहे की, युती आणि आघाडीच्या पलिकडे जाऊन शिवसेनेने २२ ते २५ जागा लढवण्याची आमची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गोव्यात अनेक पक्ष येत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर इकडून तिकडे उड्या मारण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरु होतो. परंतु या उड्यांमुळे गोव्यातील जनतेला काय मिळणार? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित करुन शिवसेना गोव्याला चांगले प्रशासन देणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले आहे. यामुळे गोव्यातील लोकंच शिवसेनाला उत्तम प्रतिसाद देऊन गोव्यातील विधानसभेवर पाठवतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका कार्यक्रमात संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना गोव्यात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर चांगलीच टीकेची तोफ डागली आहे. तसेच फोडा-फोडी करणाऱ्या भाजपवरही टीका केली आहे.

- Advertisement -

निवडणूकीसाठी आलो नाही

गोव्यात केवळ निवडणूकीचे वारे वाहू लागल्यामुळे आलो नाही तर नेहमीच येत असतो. मागील विधानसभा शिवसेनेने युतीमध्ये लढवली होती. गोवा सुरक्षा मंच, महाराष्ट्रवादी गोमंतक मंच आणि शिवेसना अशा युतीमध्ये शिवसेनेला ३ जागा दिल्या गेल्या ज्याच्याशी शिवसेनेचा संबंध नव्हता असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे काम सातत्याने सुरुच राहिले आहे.

निवडणुका येताच गळतीला सुरु

गोव्यात निवडणुका आल्या की, लगेच एका पक्षातील दुसऱ्या पक्षात जाण्यास सुरुवात झाली आहे. एका तिकीटावर निवडून यायचे आणि लगेच निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी आणि मंत्रिमपदासाठी उडी मारायची हे आता गोव्यातील जनतेला थांबवावे लागेल. हे कशापद्धतीने थांबवायचे याची योजना शिवेसनेकडे आहे. काँग्रेसला मागच्या गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले होते. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी विलंब झाल्यामुळे भाजपने आमदार फोडून सत्ता स्थापित केली त्यावेळी भाजपचे केवळ १२ आमदार निवडून आले होते. परंतु त्यांनी फोडून सत्ता केली आहे.

- Advertisement -

गोव्यातील जनतेचे प्रश्न सुटतील का?

गोव्याच्या निवडणुकीमध्ये आता टीएमसी, आप हे राजकीय पक्ष आले आहेत. कोणीही येऊद्या आणि लढू द्या परंतु त्याने गोव्यातील जनतेचे प्रश्न सुटतील का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. गोव्याच्या लोकांसमोर असंख्य प्रश्न आहेत. ते कधी सुटतील हे सांगू शकत नाही. परंतु शिवसेनेने कमिटमेंट केली आहे. आघाड्या आणि युत्या टाळायच्या आणि २२ ते २५ जागा लढायच्या, गोव्यात जर मजबूत सरकार, गोव्याच्या प्रश्नांचा आवाज उठवणारं सरकार पाहिजे असेल तर गोव्यातील लोकं शिवसेनेला निवडून देतील आणि विधानसभेवर आमदार पाठवतील गोव्यात चांगले शासन प्रशासन देण्याची आमची भूमिका आहे. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

आम्ही निर्लज्जांना घेत नाही

निवडणुकीच्या पुर्वी काही नेते निर्लज्जासारखे पक्ष बदलत असतात. आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना आम्ही घेत नाही. मी निर्लज्ज राजकारणी असे म्हटलो आहे. गोव्यात आता एका पक्षातून निवडून यायचे आणि दुसऱ्या पक्षात जायचे त्यांना निर्लज्ज म्हटलं असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गोव्यात अनेक उत्तम राजकारणी झाले आहेत. परंतु आताचे राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेलं असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.


हेही वाचा : ‘काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली’; शिवसेनेचं रोखठोक मत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -